file pic
file pic

मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरात महिलेची हत्या करुन मृतदेह जाळला

Published on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा- वडाळा पूर्वेकडील मुंबई पोर्ट ट्रस्ट (बीपीटी) परिसरात महिलेचा गुरुवारी दुपारी जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. डोक्यात जड वस्तूने प्रहार करुन या महिलेची हत्या करत हात-पाय तोडून मृतदेह गोणीत भरुन जाळण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी अज्ञात मारेकऱ्याविरोधात गुन्हा दाखल करुन वडाळा पोलीस अधिक तपास करत आहेत.

बीपीटी प्रवेशद्वार क्रमांक ४ व ५ च्या दरम्यान चिंधी गल्लीच्या मागे एका गोणीत जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह असल्याचे स्थानिकांना दिसले. या घटनेने वडाळा परिसरात एकच खळबळ उडाली. याची माहिती मिळताच स्थानिक वडाळा पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठविला.

डोक्यात प्रहार करून तिची हत्या करण्यात आली होती. तसेच, महिलेचे हात पाय तोडून मृतदेह गोणीत भरुन येथे आणून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. मृतदेह जळण्याने महिलेची ओळख पाठविणे कठीण असून मृत महिला ३५ ते ४० वयोगटातील असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

महिलेच्या हातात अंगठी आणि कानातील कर्णफुले पोलिसांना सापडली आहेत. त्याद्वारे तिची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच, जळलेल्या गोणीच्या तुकडा आणि पिवळया धातुचे मनी चिकटलेले लाल रंगाचे जळालेले कापड, तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने संशयीत आरोपीची माहिती मिळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बीपीओ रेल्वे स्टेशन इंचार्ज श्रीकांत सोनावले यांची फिर्याद नोंदवून घेत वडाळा पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात हत्या करुन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news