File Photo
File Photo

Winter Session Nagpur 2023 : अधिवेशनामध्ये नागपूर विधानभवनातील राष्ट्रवादीचे कार्यालय अजित पवार गटाकडे

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर विधानभवनातील राष्ट्रवादीचे कार्यालय अजित पवार गटाला देण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतला आहे. महायुतीचे सरकार उद्यापासून (दि.७) नागपुरातील हिवाळी अधिवेशनाला सामोरे जाणार आहे. या सरकारचे हे नागपुरातील शेवटचे हिवाळी अधिवेशन आहे.

अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा मोठा गट २ जुलैला सत्तेत सहभागी झाला. त्यानंतरचे पावसाळी अधिवेशन संभ्रमातच संपले. अधिवेशन काळातच मंत्री झालेले राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या भेटीला गेले. काका-पुतण्यांच्या राजकारणाचा अंदाज बांधण्यातच अधिवेशन संपले. मधल्या काळात मात्र राष्ट्रवादीचा तिढा सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय निवडणूक आयोगात पोहोचला. दोन्ही गटांकडून एकमेकांवर शरसंधान केले गेले. त्यामुळे या अधिवेशनात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादीचा सामना रंगण्याची शक्यता असतानाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नागपूर विधानभवनातील राष्ट्रवादीचे कार्यालय अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. याचेही पडसाद उद्यापासून सभागृहात उमटण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news