Latest
Winter session : चिनी घुसखोरीच्या मुद्यावरुन संसदेतील गदारोळ कायम
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा – तवांगमध्ये चीनने केलेल्या घुसखोरीच्या प्रयत्नाच्या मुद्यावर विरोधी पक्षांचा आक्रमक पवित्रा कायम असून, लोकसभेत या विषयावर चर्चा घडवून आणण्याच्या मागणीसाठी कॉंग्रेसने सलग दुसऱ्या दिवशी मोठा गदारोळ केला. गदारोळामुळे प्रश्नोत्तराचा तास वाया गेला. त्यानंतर शून्य प्रहरातही विरोधी पक्षांनी हा मुद्दा उपस्थित केला.
गदारोळातच मंत्र्यांकडून महत्वाची कागदपत्रे सादर करण्यात आली. अधिवेशनाची शुक्रवारी सांगता होणार असल्याने कागदपत्रे सादर करु द्यावीत, असे संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.
संवेदनशील विषयांवर चर्चा घेतली न जाण्याचा प्रघात तत्कालीन संपुआ सरकारच्या काळापासून आहे, त्यामुळे विरोधी पक्षांनी बाउ करु नये, असेही जोशी यांनी सांगितले. मात्र त्यानंतरही विरोधकांचे समाधान झाले नाही आणि त्यांनी गोंधळ सुरुच ठेवला. गदारोळामुळे पीठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल यांना कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करावे लागले.
हेही वाचा :
- स्वतःवर बलात्काराचे आरोप असलेल्यांनी आदित्य ठाकरेंवर आरोप करू नयेत : संजय राऊत
- MLA residence video : आमदारांच्या कपबशा धुतल्या जातायत टॉयलेटमध्ये : आ. मिटकरींनी शेअर केला व्हिडीओ
- MNS Social Media : "आधी राजीनामा द्या, मग काय करायचे ते करा" राज ठाकरेंची मनसे सैनिकांना ताकीद
- नगर तालुका : निवडणूक ग्रामपंचायतींची चर्चा मात्र झेडपी- बाजार समितीची: माजी मंत्री कर्डिलेच 'किंगमेकर
- Corona Prevent Meeting : कोरोना संदर्भात उच्चस्तरीय बैठक, घेणार महत्वाचा निर्णय, जिनोम सिक्वेंसिंगचे यापूर्वीच आदेश…

