

इस्लामाबाद/नवी दिल्ली; वृत्तसंस्था : आम्ही जगात शांतता नांदावी यासाठी एक देश म्हणून काम करणार आहोत, असे भारताच्या विभाजनानंतर पाकिस्तानच्या निर्मितीच्या पहिल्या दिवशी मोहम्मद अली जिना म्हणाले होते खरे, पण तसे काहीही घडले नाही. निर्मितीनंतर 76 वर्षांतच पाकिस्तान शेवटचे श्वास मोजतो आहे. परकीय चलन साठ्यात 3 अब्ज डॉलर म्हणजे 25 हजार कोटी रुपये शिल्लक आहेत. एवढ्या पैशांत 3 आठवड्यांच्या आयातीचा खर्च कसाबसा भागेल. कटोरा घेऊन दारी आलेले पाक पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासमोर चीनसह सौदी अरेबियानेही हात वर केले आहेत. आयएमएफकडूनही बेलआऊट पॅकेज मिळत नसल्याची परिस्थिती आहे. अशात पाकिस्तान आपल्याकडील अण्वस्त्रे विकायला काढेल, अशी धास्ती पाकची एकूणच प्रकृती बघता आंतरराष्ट्रीय विषयातील तज्ज्ञांना भेडसावते आहे. (Pakistan Nuclear Bombs)
सगळेच देश प्रसंगी कर्जे घेतात, पण पाकिस्तानने कर्जे घेऊन युद्धे लढली, कर्जे घेऊन दहशतवाद पोसला, कर्जाच्या रकमेतून बराच माल हडप करून पाक लष्करातील अधिकारी गब्बर बनले. एकूण कर्जात एकट्या चीनचे कर्ज 30 टक्के आहे. आयएमएफच नाही म्हणते आहे म्हटल्यावर चीनसह सौदी अरेबिया सार्यांनीच पाकला आणखी मदतीच्या बाबतीत हात वर केले आहेत. (Pakistan Nuclear Bombs)
पाक डिफॉल्टर झाल्यास…
वर्षे, कर्जे आणि युद्धे…
कर्ज फुगले
रुपया घसरला
आयात खर्च वाढला