

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीचे माजी मंत्री व आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर 'ईडी'ने समन्स बजावलेले होते. त्यानुसार आज (दि. १४) ते ईडी कार्यालयात हजर झाले. दरम्यान, आज ते मुंबईताल ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ईडीच्या चौकशीला सहकार्य करणार असून, उद्या पुन्हा एकदा कार्यालयात हजर राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 'ईडी' कार्यालयात आलो आहे. उद्या ( दि. १५ ) पुन्हा एकदा ईडी कार्यालयात उपस्थित राहणार आहे. आजच्या चौकशीमध्ये कोणतीही कागदपत्रे सादर केली नाहीत, असेही मुश्रीफ यांनी सांगितले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, पुढील दोन आठवडे माझ्याविरोधात ईडीला कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही, अशीही माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा :