

वॉशिंग्टन : सूर्यासंबंधी एक रहस्य असे आहे जे अद्याप उलगडले नाही. सूर्याच्या बाहेरील आवरण ज्याला 'कोरोना' असे म्हटले जाते, ते सूर्याच्या खालच्या थरांपेक्षा जास्त उष्ण का आहे? याला कोरोनल हिटिंग प्रॉब्लेम, असे म्हटले जाते. वैज्ञानिकांना अद्याप या प्रश्नाचे उत्तर सापडले नाही. मात्र, नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून वैज्ञानिकांना त्याचे उत्तर सापडू शकेल असे म्हटले जात आहे.
हवाईमध्ये पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली दुर्बीण डेनियलच्या इनॉय सोलर टेलिस्कोपच्या माध्यमातून अनेक देशांतील वैज्ञानिकांच्या टीमने सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचे तपशीलवार निरीक्षण केले. त्यांना सूर्याच्या खालील बाजूस असलेल्या वातावरणात क्रोमोस्फियरमध्ये चुंबकीय क्षेत्रामध्ये सापाच्या आकाराचे ऊर्जा नमुने आढळले आहेत. यामुळेच सूर्याच्या वातावरणाच्या बाह्य स्तरांवर ऊर्जा वितरीत करतात, असे शास्त्रज्ञांचे मत आहे.
बि—टनमधील शेफिल्ड विद्यापीठातील प्राध्यापक रॉबर्टस् एडर्ली यांनी म्हटले आहे, या संशोधनामुळे आपण सूर्य हा ग्रह समजून घेण्याच्या आणखी एक पाऊल पुढे जात आहोत. सूर्याच्या वातावरणातील कोरोनल हिटिंगने अनेक दशकांपासून शास्त्रज्ञांना गोंधळात टाकले आहे. सूर्याचे बाहेरील आवरणाचे तापमान 1 दशलक्ष अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असून शकते. तर सूर्याच्या पृष्ठभागावरील तापमान 6 हजार अंश सेल्सिअसपर्यंत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.
युरोपियन स्पेस एजन्सीने एक व्हिडीओ जारी केला आहे. यात सूर्याच्या आत एक सापासारखी गोष्ट सरपटताना दिसत आहे. युरोपियन स्पेस एजन्सीच्या मते, सरपटणारी गोष्ट ही सौर लहर असू शकते. ही लाट स्फोटांनी बनलेली आहे. शास्त्रज्ञांनी याला 'सर्पंट इनसाईड सन' असे नाव दिले आहे. या सौर लहरींसाठी सूर्याचे चुंबकीय क्षेत्रही कारणीभूत असल्याचे मानले जाते. लहरींच्या निर्मितीदरम्यान तापमानात चढ-उतार होत असतात आणि या चढ-उतारांमुळे अशा लहरी निर्माण होतात, असे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले होते.