आईन्स्टाईनचा मेंदू का ठेवला आहे जपून?

आईन्स्टाईनचा मेंदू का ठेवला आहे जपून?
Published on
Updated on

न्युयॉर्क : जगाला सापेक्षवादाचा सिद्धांत देणारे महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन एक अतिशय प्रतिभाशाली आणि बुद्धिमान व्यक्ती होते. जगातील महान भौतिकशास्त्रज्ञांमध्ये त्यांची गणना होते. वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी त्यांनी बीजगणित आणि युक्लिडियन भूमिती स्वतःच शिकले होते. त्यांनी त्यांच्या सापेक्षता सिद्धांताद्वारे विश्वाचे नियम स्पष्ट केले. आईन्स्टाईन जितके महान वैज्ञानिक होते, तितकेच ते तत्त्वज्ञदेखील होते. पण, तुम्हाला माहित आहे का आईन्स्टाईनचा मेंदू अजूनपर्यंत का जपून ठेवला गेला आहे?

जर्मन-अमेरिकन शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांचा जन्म 14 मार्च 1879 रोजी झाला. 18 एप्रिल 1955 रोजी वयाच्या 76 व्या वर्षी प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या मृत्यूच्या एक दिवस आधीपर्यंत ते इतके सक्रिय होते की, ते इस्रायलच्या सातव्या वर्धापन दिनाच्या सन्मानार्थ भाषणावर काम करत होते. या दरम्यान अचानक पोटाच्या धमनीमध्ये अडचण निर्माण झाल्याने त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला. पण, त्यांनी दिलेली तत्त्वं आजही सर्वसामान्यांच्या जीवनावर थेट परिणाम करतात.

1921 मध्ये त्यांना भौतिकशास्त्राचं नोबेल पारितोषिक देण्यात आलं. आईन्स्टाईन यांच्या जन्मापासून त्यांच्या डोक्याचा आकार थोडा मोठा होता. त्यामुळे ते मरण पावले तेव्हा प्रिन्स्टन विद्यापीठातील पॅथॉलॉजिस्ट डॉ. थॉमस स्टॉल्झ हार्वे यांनी त्यांचा मेंदू काढून घेतला. आपल्या मेंदूवर संशोधन करण्यात येईल अशी कल्पना आईन्स्टाईन यांना असावी, म्हणून त्यांनी आधीच असं काही करण्यास नकार दिला होता. आपल्या शरीराचा आणि मेंदूचा अभ्यास केला जावा, असं त्यांना वाटत नव्हतं.

ब्रायन बुरेल यांचं पुस्तक 'पोस्टकार्डस् फ्रॉम ब्रेन म्युझियम' नुसार, आईन्स्टाईन यांनी आधीच लिहून ठेवलं होतं की, त्यांच्या अवशेषांशी छेडछाड केली जाऊ नये. अंत्यसंस्कारानंतर अस्थी गुप्तपणे कुठेतरी विखुरल्या जाव्या. पण, हार्वे यांनी कुटुंबाच्या परवानगीशिवाय त्यांचा मेंदू चोरला. हॉस्पिटलने थॉमस हार्वेला मेंदू परत करण्यास सांगितलं. परंतु, त्यांनी तो परत केला नाही आणि 20 वर्षे लपवून ठेवला. हार्वेनेेनंतर आईन्स्टाईनचा मुलगा हॅन्स अल्बर्टकडून मेंदू आपल्याजवळ ठेवण्याची परवानगी घेतली. मात्र, त्याचा उपयोग विज्ञानाच्या हितासाठीच केला जाईल, अशी अट ठेवण्यात आली होती. पण, थॉमसकडे मेंदू नीट वाचण्याची क्षमता नव्हती. म्हणून त्यांनी मेंदूचे 240 तुकडे केले, ते रासायनिक सेलॉइडिनमध्ये ठेवले आणि तळघरात लपवले.

मात्र, हार्वेच्या पत्नीला ते आवडलं नाही. तिच्या भीतीमुळे हार्वे आईन्स्टाईनचा मेंदू मिडवेस्टला घेऊन गेले. हार्वे यांनी मेंदूवर अनेक ठिकाणी काम केलं आणि त्यांच्या सहकार्‍यांसह आईनस्टाईनच्या मेंदूवर संशोधनही करत राहिले. त्यांचा पहिला रिसर्च पेपर 1985 मध्ये प्रकाशित झाला होता, ज्यामध्ये आईन्स्टाईनच्या मेंदूचा अभ्यास करण्यात आला होता. असा दावा करण्यात आला होता की, आईन्स्टाईनचा मेंदू दोन प्रकारच्या पेशींच्या असामान्य गुणोत्तराने बनलेला होता – न्यूरॉन्स आणि ग्लिया. यानंतर आणखी 5 अभ्यास करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news