Elvish Yadav : बिग बॉस ओटीटी २ मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणारा एल्विश यादव आहे तरी कोण?

Elvish Yadav
Elvish Yadav
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : एल्विश यादव फेमस यू-ट्यूबर आहे, जो शॉर्ट चित्रपट बनवतो. (Elvish Yadav ) यूट्यूबमुळेच तो खूप लोकप्रिय झाला. त्याची सुरुवात २०१६ पासून झाली होती. २५ वर्षाचा यूट्यूबर एल्विश यादव गुरुग्राम जवळील वजीराबाद गावचा आहे. त्याने दिल्लीच्या हंसराज कॉलेजमधून बीकॉमची पदवी घेतलीय. (Elvish Yadav )

'बिग बॉस ओटीटी २' सध्या चर्चेत असून सायरस ब्रोचा घराबाहेर गेल्यानंतर शोमध्ये केवळ ८ स्पर्धक उरले आहेत. अशात बुधवारी बिग बॉसने घरात दोन स्पर्धकांची वाईल्ड कार्ड एन्ट्री केलीय. यामध्ये प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादव आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आशिका भाटिया दिसत आहेत.

दरम्यान घरातील सर्व त्यांचे स्वागत केले. एकीकडे मनीषा रानीने दोघांना जेवण दिले तर दुसरीकडे बेबिकाने एल्विशची भांडी घासली. अनेक जण एल्विश यादवविषयी जाणून घेण्यास उत्सुक आहेत.

कोण आहे एल्विश यादव?

एल्विशकडे दोन चॅनेल आहेत. एक 'एल्विश यादव व्लॉग्स' आणि दुसरा 'एल्विश नावाने. दोन्ही चॅनल्सवर ४.७ मिलियन आणि १० मिलियन सब्सक्रायबर आहेत.

यूट्यूबर एल्विश यादवचे कुटुंबीय वजीराबाद गावात राहतात. तो फाउंडेशनदेखील चालवतो. त्याच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलनुसार, तो 'सिस्टम क्लोदिंग'चा संस्थापक आहे.

एल्विशला लक्झरी लाईफसाठीदेखील ओळखले जाते. महागड्या गाड्यांचा तो शौकिन आहे. त्याने वर्ना, फॉर्च्युनर, पोर्श गाडी खरेदी केल्या आहेत. लक्झरी गाडीची किंमत १.७५ कोटी रुपये आहे. याशिवाय गुरुग्राममध्ये त्याचे अनेक फ्लॅट आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news