

पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी ज्या क्रूरतेने युक्रेनवर हल्ला करण्याचे आदेश देत आहेत. त्यावरून जगभरातील त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यांची तुलना नरसंहार करणाऱ्या जर्मनीच्या हिटरलशी केली जात आहेत. यामध्ये जगातील मान्यवर लोकदेखील आहेत. हे मान्यवर लोक कोण आहेत आणि त्यांनी पुतीन यांची तुलना हिटरलशी करताना काय म्हटलं आहे, हे पाहुया… (Putin-Hitler)
प्रिन्स चार्ल्स : या महिलेचे पूर्वज प्रत्यक्ष हिटरलच्या क्रूरतेमध्ये बळी गेलेले आहेत. होलोकाॅस्टमध्ये हिटरलने तिच्या नातेवाईकांची हत्या केली होती. प्रिन्स चार्ल्स म्हणते की, "रशिया राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन हे हिटरलसारखेच क्रूर वागत आहेत."
व्होल्फगॅंग स्केबले : हे जर्मनचे अर्थमंत्री आहेत. त्यांनी इतिहासाचा दाखला देत म्हटलं आहे की, "आम्हाला सर्व इतिहास माहीत आहे. हिटलरने ज्या पद्धतीने सुडेन्डलॅंडवर कब्जा मिळवला, त्याच पद्धतीचा वापर रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन करत आहेत."
व्लादिस्लेव इनोझेमत्सेव्ह : माॅस्को टाईम्समध्ये कार्यरत असून ते म्हणतात की, "हिटरलप्रमाणे पुतीन यांनाही एक जागतिक स्थिर अवस्था कशी तयार करावी, याची कल्पना नाही. हिटरलने ज्या पद्धतीने जर्मन लोकांसाठी एक हक्काचा प्रांत देण्याचा जसा प्रयत्न केला तसाच प्रयत्न व्लादिमीर पुतीन करत आहेत."
हिलरी क्लिंटन : अमेरिकेच्या राष्ट्राध्याक्ष पदाच्या दावेदार राहिलेल्या हिलरी क्लिंटन म्हणतात की, "३० च्या दशकात हिटरल काय म्हणत राहिला की, आमच्या लोकांना (जर्मन नागरिक) चांगली वागणूक दिली जात नाही. त्यामुळेच ते नाराज झालेले आहेत. मला त्यांचं संरक्षण केलं पाहिजे. अशा पद्धतीने पुतीन आज म्हणत आहेत."
जाॅन मॅककेन : हे सिनेट मेंबर आहेत. ते पुतीन यांच्यासंदर्भात म्हणतात की, "जर पुतीन यांना रशियन भाषिक लोकांचा विचार करून सार्वभौम राष्ट्रात जाण्याची परवानगी दिली, तर पुतीन यांच्या हालचाली या हिटरलसारख्याच आहेत, असं म्हणावं लागेल. दुसऱ्या महायुद्धात हिटरलनेही हिच गोष्ट केलेली होती."
मॅक्रो रुबिओ : हे सिनेट मेंबर आहेत. ते म्हणतात की, "पुतीन यांनी ज्या प्रकारे दावा केलेला आहे, वांशिक गटाचे संरक्षण करण्यासाठी आम्हाला शेजारच्या राष्ट्रात जाण्याची गरज आहे, असा दावा हिटलरनेही १९३० साली केला होता. पुतीन यांचा युक्तीवाद हिटरलसारखाच आहे."
स्टिफन हार्पर : कॅनडाचे पंतप्रधान स्टिफन हार्पर म्हणतात की, "दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच आम्ही असे युद्ध पाहिले आहे."
गॅरी कास्पारोव्ह : हे एक रशियन कार्यकर्ते आणि बुद्धीबळपटू आहे. ते म्हणतात की, "हेतूपूर्वक असो किंवा नसो. पण, पुतीन यांनी सोचीसाठीचे बर्लिन १९३६ प्लेबुक अगदी जवळून फाॅलो केलेले आहे."
चार्ल्स लेन : हे वाॅशिंग्टन पोस्टचे संपादकीय लेखक आहेत. ते म्हणतात की, "पुतीन आणि हिटलर यांची तुलना वरवरची वाटत असली तरी ही तुलना तंतोतंत योग्य म्हणावी लागेल. आणि हे चिंताजनक आहे."
हे वाचलंत का?