2024 सालात कोठे गुंतवणूक कराल?

2024 सालात कोठे गुंतवणूक कराल?
Published on
Updated on

2014 साली सेन्सेक्स 20 हजार होता. या काळात दोन वेळा मोठ्या प्रमाणात मार्केट कोसळले होते. 2015 मध्ये युआन चलनाचे अवमूल्यन झाले तेव्हा 22 टक्के मार्केट कोसळले होते. त्यानंतर कोव्हिड काळात 38 टक्के मार्केट कोसळले होते. मार्केट हे अल्पकाळासाठी कोसळते आणि दीर्घकाळासाठी वाढते, हे दिसते.

मागील दहा वर्षांचा आढावा घेतल्यास 20 हजारांवरून सेन्सेक्स 72 हजारांवर पोहोचला आहे. सरासरी परतावा 13 टक्के दिला आहे. मागील एक वर्षात जाने. 2023 मध्ये सेन्सेक्स 60747, निफ्टी 17495, बँक निफ्टी 42014 अंकावर होता. आज सेन्सेक्स 72568, निफ्टी 21894, बँक निफ्टी 47709 अशा उच्चांकी अंकावर पोहोचले आहेत. देशातील भांडवली बाजाराने मागील वर्षी खालीलप्रमाणे परतावा दिला आहे.

सेन्सेक्स 21.03 टक्के, निफ्टी स्मॉल कॅप 61.12 टक्के
निफ्टी 22.60 टक्के, निफ्टी 100 – 22.91 टक्के
बँक निफ्टी 13.37 टक्के
निफ्टी मिड कॅप 51.51 टक्के

जाने. 23 मधील 60747 चा सेन्सेक्स मार्च 2023 मध्ये 57628 अंकावर वर्षभरातील नीचांकावर गेला होता. याच वर्षी 28 डिसें. 2023 रोजी उच्चांकी पातळीवर 72410 वर पोहोचला होता. या वर्षातील मंदीत गुंतवणूक करून तेजीत बाहेर पडले असतील, तर त्यांना वर्षभरात 20 टक्के परतावा मिळालेला दिसतो. आक्टो. 23 नंतर मार्केटमध्ये सातत्याने तेजी दिसते. याचे कारण मागील तीन महिन्यांत परदेशी गुंतवणूकदारांकडून 76 हजार कोटींची खरेदी झाली आहे. अजूनही परकीय गुंतवणूकदारांचा ओघ वाढण्याची शक्यता आहे.

सध्या मार्केट कॅपिटल ते जीडीपी रेषो पाहिल्यास 106 टक्के आहे. सेन्सेक्स पीई रेषो 23.15, निफ्टी 23.2, बँक निफ्टी 16.56 आहे. सध्याचे मार्केट उच्चांकी पातळीवर आहे. थोडे महाग आहे; पण खूप महाग नाही. Modrately Overvalued आहे, असे म्हणता येईल.

प्रत्येक वर्षी मार्केट तेजी-मंदीनुसार खाली-वर होत असते. 2024 मध्ये मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्याची वेळ असेल, त्यावेळेला त्या त्या सेक्टरचा Price to Earning Ratio आणि PB Ratio पाहणे गरजेचे असते.

पीई रेषो म्हणजेच मिळकतीशी किमतीचे प्रमाण किती आहे, याचा अर्थ असा असतो – एक रुपया मिळकत करण्यासाठी तुम्ही किती रुपये गुंतवणूक करावे लागते, हे कळते. जितका पीई रेषो जास्त असतो तितका तो शेअर्स महाग असतो. सरासरी 20 पेक्षा कमी पीई रेषो असेल, तर भविष्यात चांगला परतावा मिळू शकतो. पीई रेषो कमी असतो त्या ठिकाणी केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरते.

Price to Book Value पीबी रेषो म्हणजे कंपनीच्या शेअर्सची बूक व्हॅल्यूपेक्षा किती रक्कम जास्त देत आहोत हे कळते. गुंतवणूक करताना वरील दोन्ही रेषो पाहणे गरजेचे आहे. सध्या मार्केट उच्चांकी पातळीवर असले, तरी काही सेक्टरमध्ये अजून गुंतवणूक करण्यास वाव आहे, हे कळते. त्यासाठी वेगवेगळ्या सेक्टरचा खालील लहरीीं चा अभ्यास करावा, जो तुम्हाला 2024 मध्ये गुंतवणुकीबाबत निर्णय घेण्यासाठी उपयुक्त ठरेल.

समोरील चार्टचे अवलोकन केले असता बँक निफ्टी, निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस, निफ्टी पीएसयू बँक, निफ्टी प्रायव्हेट बँक, निफ्टी ऑईल अँड गॅस या सेक्टरमधील पीई रेषो 20 च्या खाली आहे. याचा अर्थ सदर सेक्टरमध्ये गुंतवणूक करण्यास संधी आहेत. बाकीचे सेक्टर पीईच्या हिशेबाने खूपच महाग वाटतात. सध्याच्या मार्केटमधील मिड कॅप आणि स्मॉल कॅप हे महाग वाटतात. त्यांच्या तुलनेत लार्ज कॅपमध्ये वाढण्यास अजून वाव आहे.

मागील तीन वर्षांत ज्याप्रमाणे मिड कॅप, स्मॉल कॅपने परतावा दिला आहे, त्या तुलनेत लार्ज कॅपमधील शेअर्स वाढलेले दिसत नाहीत. जगातील इतर देशांच्या तुलनेत आपली अर्थव्यवस्था मोठ्या जोमाने वाढत आहे.

परकीय गुंतवणूक आणि एसआयपी माध्यमातून येणार्‍या पैशामुळे सध्या तेजीचे दिवस आहेत. तेजीमध्ये मागील परतावा पाहून गुंतवणूक करणे हा निर्णय चुकीचा ठरू शकतो. त्याबाबत बाजारातील जोखीम समजावून घेतली पाहिजे आणि गुंतवणूक करताना एकदम न करता सावधपणे केले पाहिजे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news