El Nino : उष्म्यासाठी कारणीभूत ‘एल निनो’ काय आहे?

El Nino : उष्म्यासाठी कारणीभूत ‘एल निनो’ काय आहे?
Published on
Updated on

लंडन : जगभरात सध्या जागतिक तापमानवाढीचे परिणाम दिसत आहेत. त्याच्या प्रभावामुळे यावर्षी फेब्रुवारीमध्ये विक्रमी उष्मा येण्याची शक्यता आहे. 'द गार्डियन' या इंग्रजी वृत्तपत्राने आपल्या एका वृत्तात याचा उल्लेख केला आहे. अहवालानुसार, फेब्रुवारीमध्येच जगभरातील समुद्राच्या पातळीच्या तापमानात वाढ झाल्यामुळे, वर्षातील सर्वात लहान महिना असलेल्या फेब्रुवारीमध्ये पारा नवीन विक्रमी पातळीवर वाढत आहे. हवामानशास्त्रज्ञांनी यासाठी एल निनोला (El Nino) जबाबदार धरले आहे, ज्यामुळे जगभरात उष्णता वाढली आहे.

एल निनो (El Nino) प्रभाव ही एक विशेष हवामान घटना आहे जी मध्य आणि पूर्व पॅसिफिक महासागरातील समुद्राचे तापमान सामान्यपेक्षा जास्त असते तेव्हा उद्भवते. सोप्या भाषेत या परिणामामुळे तापमानात लक्षणीय वाढ होते. त्यामुळे पश्चिम पॅसिफिकमधील गरम पाण्याचा प्रवाह विषुववृत्ताच्या बाजूने पूर्वेकडे सरकू लागतो, ज्यामुळे भारताच्या हवामानावर परिणाम होतो. अशा परिस्थितीत दक्षिण आशिया प्रदेशाला भयंकर उष्णतेचा सामना करावा लागतो आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ लागते. भारत देखील याच प्रदेशात आहे, त्यामुळे एल निनोच्या प्रभावामुळे येथे उष्णता वाढते.

इ. स. 1500 च्या सुमारास पेरू देशाच्या पश्चिम किनार्‍यावर लहान बोटींतून मासेमारी करणार्‍या कोळ्यांना प्रशांत महासागराचे तापमान दर काही (सुमारे 4 ते 7) वर्षांनी वाढत असल्याचे सर्वप्रथम लक्षात आले. पाण्याचे तापमान वाढण्याची घटना सहसा नाताळाच्या सुमारास घडत असे. त्यामुळे त्या घटनेचे नामकरण 'एल निनो' (या स्पॅनिश शब्दाचा अर्थ छोटा मुलगा) असे केले. इ.स. 1700 ते 1900 च्या दरम्यान अनेक युरोपीय खलाशांनी या तापमानवाढीच्या नोंदी लिहून ठेवल्या. (El Nino)

1891 मध्ये पेरू देशातील डॉ. लुइस करँझा या भूगोलतज्ज्ञाने दक्षिण अमेरिकेच्या पाऊसपाणी आणि हवामानातील विचित्र बदल हे एल निनोमुळे होतात, असे संशोधन प्रसिद्ध केले. जेव्हा प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागातील पाण्याचे तापमान वाढते आणि प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील भागातील हवेचा दाब वाढलेला असतो, तेव्हा पश्चिमेकडून पूर्व दिशेस वारे वाहतात. त्यासोबत बाष्पाने भरलेले ढग तिकडे वाहून जातात. परिणामी, पूर्वेकडील भागात अतिवृष्टी, तर पश्चिमेकडील भागात दुष्काळी स्थिती अशाप्रकारे एल निनोचा परिणाम दिसतो. जेव्हा प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागातील पाण्याचे तापमान थंड होते, तेव्हा पश्चिमेकडील भागातील हवेचा दाब कमी होतो.

प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील भागाकडे वारे पाण्याची वाफ ढगांच्या स्वरूपात वाहून आणतात आणि त्यातून पश्चिमेकडील भागात अतिवृष्टी होते. त्याला 'ला निना' असे संबोधतात. काही काळापर्यंत समुद्राच्या पाण्याची होणारी तापमानवाढ पृथ्वीवरील हवामानबदलाला कारणीभूत ठरते. ही क्रिया अधूनमधून अचानकपणे घडते. या घटनेचा संबंध पृथ्वीवर होणारी दुष्काळी परिस्थिती, महापूर आणि त्याचा थेट पिकांच्या उत्पादनावर होणारा परिणाम याच्याशी जोडला जातो. उष्ण कटिबंधातील प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागातील पाण्याच्या तापमानातील फरक, की ज्यामुळे एल निनो किंवा ला निना हे परिणाम प्रशांत महासागराच्या उष्ण कटिबंधातील पश्चिम भागावर स्पष्टपणे होत असल्याचे दिसून आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news