Urad Dal Health Benefits: उडीद प्रजननासाठी वरदान.. पुरूषांना होतो खास फायदा

Urad Dal Health Benefits
Urad Dal Health Benefitspudhari
Published on
Updated on

प्रजनन क्षमतेत वाढ

आयुर्वेदामध्ये उडीद 'शुक्रवर्धक' मानले जाते; हे पुरुषांमध्ये स्पर्म काउंट आणि सेक्सुअल स्टॅमिना वाढवण्यास, तर स्त्रियांमध्ये फर्टिलिटी सुधारण्यास मदत करते.

शारीरिक कमजोरीवर प्रभावी

उडीद हे मधुर, गुरु आणि स्निग्ध गुणांचे असल्याने वाढत्या वयासोबत येणारी कमजोरी, इन्फर्टिलिटी आणि हार्मोन्सचे असंतुलन दूर करण्यास मदत करते.

वात विकारांवर गुणकारी

उडीद हे गुरु, स्निग्ध आणि उष्ण गुणात्मक असल्यामुळे शरीरातील वात दोष कमी करते, ज्यामुळे सांधेदुखीच्या (Joint Problems) त्रासात चांगला आराम मिळतो.

पापडाचे योग्य सेवन

आहारात रोज एक उडदाचा पापड भाजून खाऊ शकता, मात्र तो तळून खाणे टाळावे आणि शक्यतो घरच्या पिठापासून बनवलेला असावा.

बाहेरचे पीठ टाळा

बाजारात मिळणाऱ्या तयार पिठाच्या पापडामध्ये प्रिजर्व्हेटिव्ह्ज आणि केमिकल्स असू शकतात, त्यामुळे घरी तयार केलेल्या शुद्ध पिठालाच प्राधान्य द्यावे.

आहारातील इतर पर्याय

आपण आपल्या रोजच्या जेवणात भाजीमध्ये उडीद डाळ वापरू शकता किंवा इडली, डोसा, उत्तप्पा यांसारख्या पदार्थांमधूनही याचे सेवन करू शकता.

कफ आणि पित्त वाढण्याची शक्यता

उडीद हे कफवर्धक आणि उष्ण गुणांमुळे पित्तवर्धक देखील आहे; त्यामुळे ज्यांना ॲसिडिटी किंवा उष्णतेचा जास्त त्रास आहे त्यांनी हे जपून खावे.

पचनशक्ती आणि गॅसेस

जर तुमची पचनशक्ती कमकुवत असेल, तर उडीद डाळीमुळे गॅसेस किंवा ब्लोटिंगचा (पोट फुगणे) त्रास होऊ शकतो, अशा लोकांनी याचे प्रमाण कमी ठेवावे.

logo
Pudhari News
pudhari.news