Alcohol & Beer Belly: दारू पिल्यानंतर पोट का सुटतं... कोणता घटत ठरतो कारणीभूत?

Anirudha Sankpal

दारू पिल्यानंतर पोट सुटतं असं अनेकजण दावा करतात. मात्र हा दावा खरा आहे का असेल तर त्यामागचे शास्त्रीय कारण काय?

alcohol mixing health risks | (Canva Photo)

पोटाभोवती चरबी साठणे

शरीर दारूला विषारी पदार्थ मानून आधी त्याचे विघटन करते; त्यामुळे चरबी व कार्बोहायड्रेट्स बाजूला पडून अतिरिक्त कॅलरीज पोटाभोवती साठतात.

Belly fat loss | Pinterest

जास्त कॅलरीजचे प्रमाण

अल्कोहोलमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप जास्त असते; साधारणपणे एका बिअरमधून शरीराला १५० ते २०० कॅलरीज मिळतात.

चकणा आणि जंक फूड

दारू पिताना किंवा पिऊन झाल्यानंतर लोक मोठ्या प्रमाणात चकणा, फास्ट फूड आणि जड जेवण करतात, ज्यातून अतिरिक्त कॅलरीज मिळतात.

मेटाबॉलिझम मंदावणे

दारूचा थेट परिणाम लिव्हरवर होतो, ज्यामुळे शरीरातील 'फॅट मेटाबॉलिझम' (चरबी पचवण्याची क्रिया) बिघडते आणि चरबी वाढू लागते.

व्हिसरल फॅटमध्ये वाढ

अल्कोहोलमुळे शरीरात 'व्हिसरल फॅट' (अंतर्गत अवयवांवरील चरबी) वाढते, जी प्रामुख्याने लिव्हर, किडनी आणि पोटाच्या भागाभोवती साठते.

Water add Alcohol | Pudhari

भूक वाढणे

दारूमुळे शरीरातील तृप्तीची भावना निर्माण करणाऱ्या हार्मोन्सवर परिणाम होतो, ज्यामुळे रात्री उशिरा जास्त खाण्याची आणि जंक फूडची इच्छा तीव्र होते.

Alcohol Consumption 10 Country | (Canva Photo)

हार्मोन्समध्ये बदल

नियमित मद्यपानाने पुरुषांमधील 'टेस्टोस्टेरॉन' संप्रेरक कमी होते आणि 'कॉर्टिसॉल' (स्ट्रेस हार्मोन) वाढते, जे पोटावर चरबी साठवण्यास कारणीभूत ठरते.

Hormone News | Pudhari Photo
येथे क्लिक करा