Snow Leopard |हा मार्जारकुळातील प्राणी आहे ‘पहाडोंका भूत’

Snow Leopard |हा मार्जारकुळातील प्राणी आहे ‘पहाडोंका भूत’
Published on
Updated on

स्‍नो लेपर्ड किंवा हिमालयीन बिबट्याचे दर्शन इतके दुर्मिळ आहे की याला ‘पहाडोंका भूत’ असे संबोधले जाते

याचे वैज्ञानिक नाव Panthera uncia असे असून, हिमालयीन डोंगररांगामध्ये चार हजार मिटर उंचीवर याचे वास्‍तव्य असते

भारतातील जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम व अरुणाचल प्रदेशमध्ये प्रामुख्याने दिसून येतो

भारताबाहेर नेपाळ, भूतान, चीन, मंगोलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, कझाकस्तान, किर्गिझस्तान, उझबेकिस्तान आणि रशिया या देशांमध्येही आढळतो

डोंगरी मेंढ्या, हरीण, बर्फाळ प्रदेशातील ससे यांची शिकार हिमबिबट्या करतो

हिमबिबट्याचे पाय रूंद व केसाळ असतात, जे बर्फावर चालताना त्याला आधार देतात.

याची फर राखाडी ते पांढरट असते, त्यावर गडद रंगाचे डाग असतात. यामुळे शिकार करताना तो बर्फात सहज लपतो.

त्याचा आवाज फारसा ऐकू येत नाही, म्हणून त्याला “मूक बिबट्या” देखील म्हणतात.

याचे वैशिष्‍ट्य म्‍हणजे एका झेपेत ५० फूटांपर्यंत उडी मारू शकतो.ही क्षमता त्‍याला डोंगरकपारीत शिकार करण्यास मदत करते

अवैध शिकारीमुळे भारतात आता केवळ ७०० स्‍नो लेपर्ड शिल्‍लक राहिले आहेत, Vulnerable (अत्यंत धोका असलेला)प्रजातीमध्ये याची गणना होते

Canva Image

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news