श्रुती... काय गं तुझं हे मनमोहक सौंदर्य, खरंच देवी दिसतेस!

अभिनेत्री श्रुती मराठे हिने महाराणीच्या लुकमधील काही फोटो शेअर केले आहेत.

नेटकऱ्यांनी श्रुतीच्या ट्रॅडिशनल भारतीय लूकचे भरभरून कौतुक केले आहे.

काही चाहत्यांनी तर श्रुतीच्या फोटोशूटला राजा रविवर्मा या प्रसिद्ध चित्रकाराने काढलेले चित्र असल्याचे म्हटले आहे.  

लोकप्रिय अभिनेत्री श्रुती मराठे हिने अभिनयाच्या जोरावर आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

‘सनई चौघडे’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘बंध नायलॉनचे’, ‘शुभ लग्न सावधान’ अशा चित्रपटात तिने भूमिका केली आहे.