Web Stories
Protein Diet Tips : बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी प्रोटीन आवश्यक, आहारात कसे वाढवाल?
Canva
पोषक आहारासाठी जागरूकता पसरवण्यासाठी राष्ट्रीय पोषण सप्ताह नुकताच साजरा झाला.
Canva
WHO आणि ICMR मते निरोगी प्रौढांसाठी दररोज प्रति किलो वजनानुसार ०.८–१.० ग्रॅम प्रोटीनचा आहारात समावेश असावा.
Canva
प्रथिने फक्त खेळाडूंसाठी नसतात. तर किशोरवयीन मुलांसह प्रौढ आणि वृद्धांसाठीही आवश्यक आहेत.
Canva
एका सर्वेक्षणात आढळले आहे की, सुमारे ७०% भारतीय प्रथिनांच्या गरजेपेक्षा कमी प्रथिने घेतात.
Canva
आहारात प्रोटीनच्या कमतरतेमुळे थकवा, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे, केस गळणे आणि स्नायू कमकुवत होणे ही लक्षणे जाणवतात.
Canva
मुलांना वाढ आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी जास्त प्रथिनांची आवश्यकता असते.
Canva
दिवसाच्या सुरुवातीलाच डाळीपासून केलेल्या पदार्थांसह पनीर किंवा दही यांचा यांचा नाश्त्यामध्ये समावेश करा. हे पदार्थ सुमारे १०–२० ग्रॅम प्रथिने देतात.
Canva
डाळ-भात एकत्र खाल्ल्याने शरीरातील अमिनो ॲसिड संतुलित राहतात आणि जेवणाची प्रथिनांची गुणवत्ता वाढते.
Canva
दूध, पनीर आणि दही फक्त कॅल्शियमचे स्रोत नाहीत; तर ते ५–१० ग्रॅम प्राेटीन देतात.
Canva
एका अंड्यामध्ये ६ ग्रॅम प्रथिने असते. प्राेटीनसाठी अंडे हे सर्व वयोगटासाठी झटपट आणि बहुउपयोगी पर्याय ठरताे.
Canva

