Daily Habits For Strength | जिमची गरजच नाही! दररोजच्या 'या' सवयींतून शरीराची ताकद वाढवा
शरीराची ताकद वाढवण्यासाठी जिममध्ये जाणेच आवश्यक नाही. दैनंदिन जीवनातील छोट्या-छोट्या सवयींमधूनही शरीर मजबूत करता येते
नियमित बैठका मारा आणि वजन उचलताना योग्य पद्धतीचा अवलंब करा. यामुळे शरीराची ठेवण सुधारण्यास आणि दुखापतींचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते
जिने चढण्याचा व्यायाम मांड्या, नितंब आणि पोटऱ्यांच्या स्नायूंना बळकटी देतो. अधूनमधून एकावेळी दोन पायऱ्या चढण्याचाही सराव करू शकता
बागकाम करणे, फावड्याने माती उकरणे, झाडांची छाटणी करणे किंवा अंगणातील पानांचा कचरा गोळा करणे अशा कामांतूनही शरीराचा चांगला व्यायाम होतो
किराणा सामानाच्या पिशव्या उचलणे किंवा योग्य पद्धतीने बैठका मारणे अशा साध्या हालचालींचाही शरीराला फायदा होतो
जमिनीवरून कोणतीही जड वस्तू उचलताना पाठीऐवजी गुडघे वाकवा. वस्तू उचलताना पोटाचे स्नायू सक्रिय ठेवा आणि पाठीचा कणा वाकवणे टाळा
मुलांसोबत खेळणे, पाळीव प्राण्यांच्या मागे धावणे किंवा शरीराचा समतोल राखावा लागणाऱ्या हालचाली करणे हेही व्यायामाचे प्रभावी प्रकार आहेत
खेळकर आणि गतिमान हालचालींचा सराव केल्यास दैनंदिन कामांसाठी आवश्यक असलेली शारीरिक क्षमता विकसित होण्यास मदत होते
कोणताही व्यायाम सुरू करण्यापूर्वी आपल्या शारीरिक क्षमतेचा विचार करावा. आवश्यक असल्यास डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

