पुढारी वृत्तसेवा
सिंहाला जंगलाचा राजा मानले जात असले, तरी जंगलातील असे अनेक प्राणी आहेत, जे सिंहालाही पराभूत करण्याची क्षमता ठेवतात
वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, हे प्राणी आपल्या प्रचंड आकारमानाचा, शारीरिक ताकदीचा आणि बचावात्मक कौशल्यांचा वापर करून सिंहाला कडवी टक्कर देतात
त्यामुळे सिंह अजिंक्य नसून, त्याच्यापेक्षा अधिक शक्तिशाली किंवा आक्रमक प्राण्यांसमोर त्यालाही माघार घ्यावी लागू शकते
पाणघोडा हा शाकाहारी प्राणी असला, तरी त्याचे प्रचंड जबडे आणि धारदार सुळे सिंहाला गंभीर जखमी करू शकतात. विशेषतः पाण्याजवळ आलेल्या सिंहासाठी पाणघोडा धोकादायक ठरू शकतो
हत्तीचे प्रचंड शरीर, लांब सुळे आणि अफाट ताकद यामुळे तो सिंहासाठी मोठे आव्हान ठरतो. हत्तीने वेगाने हल्ला केल्यास सिंहाला पायाखाली तुडवून किंवा सुळ्यांनी गंभीर जखमी करू शकतो
गेंडा हा अत्यंत वजनदार आणि शक्तिशाली प्राणी आहे. त्याच्या डोक्यावरील तीक्ष्ण शिंगामुळे तो स्वतःचे प्रभावी संरक्षण करू शकतो. सिंहाने गेंड्याची शिकार करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला गेंड्याच्या शिंगाचा प्राणघातक फटका बसू शकतो
केप बफेलो या म्हशीची मजबूत शिंगे सिंहाला गंभीर किंवा प्राणघातक जखमा करू शकतात. विशेष म्हणजे, कळपाने एकत्रितपणे केलेला प्रतिकार सिंहासाठी अधिक धोकादायक ठरतो
मगरीच्या जबड्यांमध्ये प्रचंड ताकद असते. पाणी पिण्यासाठी किंवा नदी ओलांडण्यासाठी आलेल्या सिंहाला मगर आपल्या जबड्यात पकडून पाण्याखाली ओढू शकते
सिंह अनेक परिसंस्थांमध्ये सर्वोच्च शिकारी मानला जात असला, तरी वाघ, ग्रिझली अस्वल, तरसांचे कळप आणि आफ्रिकन रानकुत्र्यांचे समूहही त्याला कडवी टक्कर देऊ शकतात