Mental Health | मनशांती हवीय? नक्की ट्राय करा 'या' ६ सोप्या टिप्स
मानसिक आरोग्य टिकवून ठेवणे ही एका दोरीवरच्या कसरतीसारखे आहे.
मानसिक संतुलन राखण्यासाठी दररोज काही सकारात्मक सवयींचा जाणीवपूर्वक सराव करणे अत्यंत आवश्यक आहे. जाणून घेवूया या सवयींविषयी...
शारीरिक हालचाल मनाला प्रसन्न ठेवते. संशोधनानुसार, दररोज केवळ १५ मिनिटे धावण्याने किंवा एक तास चालल्याने गंभीर नैराश्याचा (Depression) धोका २६% पर्यंत कमी होऊ शकतो.
'माइंडफुलनेस' किंवा सजगतेचा सराव विश्रांतीसाठी आणि वर्तमान क्षणात जगण्यासाठी रोज १० ते १५ मिनिटे वेळ काढा. यामुळे विचारांचा गुंता सुटतो आणि चिंतेचे चक्र थांबवण्यास मदत होते.
मानसिक आरोग्य हे झोपेवर अवलंबून असते. दररोज किमान ७ ते ९ तास झोप हवीच. कारण भावनिक संतुलन राखण्यासाठी शरीर आणि मेंदूला विश्रांतीची गरज असते.
नातेसंबंध जोपासा. आपल्या माणसांशी जोडलेले राहा. मजबूत नातेसंबंध तणावाविरुद्ध ढाल म्हणून काम करतात. याउलट, दीर्घकाळचा एकाकीपणा आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतो.
अभ्यासातून असे दिसून आले आहे की, निसर्गाच्या सानिध्यात घालवलेले अवघे २० मिनिटे तुमच्या शरीरातील 'स्ट्रेस हार्मोन्स'ची पातळी लक्षणीयरीत्या कमी करू शकतात.
सकारात्मक मानसिकतेसाठी दररोज रात्री अशा तीन गोष्टी लिहून काढा ज्याबद्दल तुम्हाला कृतज्ञ वाटते. ही छोटीशी सवय तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकते.

