पुढारी वृत्तसेवा
दिवसभरात न कंटाळता ६ ते ८ तास अभ्यास करायचा असेल तर पुढील टीप्स उपयुक्त ठरतील.
अभ्यासाला पहिल्याच दिवशी खूप तास बसण्याचा प्रयत्न करू नका. आधी दिवसभरात २-३ तास अभ्यासाची सवय लावा आणि मग हळूहळू वेळ वाढवा.
सतत अभ्यास करण्याऐवजी सलग ५० मिनिटे मन लावून अभ्यास करा. त्यानंतर १० मिनिटांचा छोटा ब्रेक घ्या.
एकाचवेळी अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न (मल्टीटास्किंग) करू नका. एका सत्रात फक्त एकाच विषयावर पूर्ण लक्ष केंद्रित करा.
अभ्यास करताना केवळ वाचत बसू नका. उत्तरे लिहून काढा, संकल्पना स्वतःलाच मोठ्याने समजावून सांगा आणि वेळोवेळी स्वतःची छोटी परीक्षा घ्या.
अभ्यासामध्ये जो ब्रेक घ्याल, त्यात मोबाईल बघणे टाळा. त्याऐवजी थोडे चाला, पाणी प्या किंवा शरीर ताणून हलका व्यायाम करा.
एकाच वेळी खूप मोठा अभ्यास पूर्ण करायचा दबाव घेऊ नका. दिवसाच्या सुरुवातीला छोटी पूर्ण करता येतील, अशी ध्येये ठरवा.
अभ्यासासोबतच शरीराला ७-८ तासांची चांगली झोप मिळणे आवश्यक आहे. एका दिवशी खूप अभ्यास करण्यापेक्षा, रोज थोडा-थोडा; पण नियमित अभ्यास करणे जास्त फायद्याचे ठरते.