

जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या लिओनेल मेस्सीने पुन्हा एकदा आपला प्रभाव दाखवला आहे.
एका आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामन्यात अर्जेंटिनाने पोर्तो रिको संघाचा ६-० असा मोठा पराभव केला.
या गोल-फेस्टमध्ये मेस्सीने दोन असिस्ट (गोल करण्यासाठी मदत) करत प्लेमेकरची भूमिका साकारली.
अर्जेंटिनाकडून लौटारो मार्टिनेझ आणि अलेक्सिस मॅक ॲलिस्टर यांनी प्रत्येकी दोन गोल केले.
या दोन असिस्टमुळे मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील सर्वाधिक असिस्ट करण्याचा जागतिक विक्रम मोडला.
यापूर्वी हा विक्रम मेस्सीचा बार्सिलोनाचा माजी सहकारी नेमार ज्युनियरच्या नावावर होता.
या सामन्याआधी नेमारने ब्राझीलसाठी ५९ असिस्ट केले होते, तर मेस्सी ५८ असिस्टसह त्याच्या मागे होता.
पोर्तो रिकोविरुद्धच्या सामन्याअंती मेस्सीची असिस्टची संख्या ६० झाली आणि त्याने नेमारला मागे टाकले.