अविनाश सुतार
घरी रोख रक्कम ठेवणे बेकायदेशीर आहे का? कायदेशीररित्या किती रोख ठेवू शकतो? आयकराचे काय नियम आहेत? याबाबत जाणून घेऊया
घरी रोकड ठेवण्यावर कोणतीही कायदेशीर मर्यादा नाही, कायद्याने कोणतीही मर्यादा घातलेली नाही
आयकर विभागाची सर्वात महत्त्वाची अट म्हणजे ती रक्कम कायदेशीर आणि सिद्ध करता येईल, अशा स्त्रोतातून आलेली असावी
तुमच्या उत्पन्न कर विवरणपत्रात (ITR) तुम्ही ही माहिती दाखवली पाहिजे आणि गरज पडल्यास त्या पैशाचा स्रोत स्पष्ट करता आला पाहिजे
रोख रक्कम कुठून आली ते सांगू शकला नाहीत, तर ती ‘अघोषित उत्पन्न’ मानली जाईल. आयकर विभाग एकूण रकमेवर सुमारे 78 % पर्यंत कर आणि दंड आकारू शकतो
प्रत्येक रुपयाचा पुरावा देण्यासाठी तुमच्या उत्पन्नाच्या नोंदी, व्यावसायिक खातेपुस्तके आणि ITR फाइलिंगमध्ये त्या रकमेचा मागोवा असावा
जर तुम्ही व्यावसायिक असाल, तर तुमच्या कॅशबुकमधील नोंदी आणि खातेपुस्तकांमधील रोख रकमेमध्ये ताळमेळ असणे आवश्यक आहे
घरी असलेली मोठी रक्कम अधिकृत उत्पन्न किंवा बचतीच्या दस्तऐवजांद्वारे समर्थित असावी. हे पारदर्शकता राखण्यासाठी आणि कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी आवश्यक आहे
पैसे प्रामाणिक मार्गाने मिळवलेले, योग्य प्रकारे जाहीर केलेले आणि पुराव्यांसह नोंदवलेले असतील, तर तुम्हाला काळजी करण्याचे काहीही कारण नाही