जेजुरीतील खंडोबा मंदिरावर सूर्योदयावेळी सूर्याच्या किरणांचे पांघरूण

सोनेरी किरणांचा जणू खंडोबाला अभिषेकच सुरू असल्याची अनुभूती येत आहे.

मंदिराच्या शिखरासह परिसरात सोनेरी वातावरण दिसत आहे.

भाविकांच्या ओठी आपोआप ‘देवा तुझी सोन्याची जेजुरी...’ अशा ओळी येत आहेत.

हे मनोहारी दृश्य छायाचित्रकार(दै. पुढारी) महेश शिंदे यांनी आपल्या कॅमेर्‍यात टिपले आहे.