Jalna Crime : लूटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; खंजरसह एक जेरबंद

पोलिसांनी एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
robbery gang busted Jalna
जालना ः शहरात कदीम जालना पोलिसांनी धारदार खंजरसह एका आरोपीस जेरबंद केले.गुन्ह्यात पकडलेल्या खंजरसह पोलिस अधिकारी.pudhari photo
Published on
Updated on

जालना : शहरातील जुना जालना भागातील राममंदिर जवळील राहुल नगरात पादचाऱ्यास लुटणाऱ्या टोळीचा कदीम जालना पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. अन्य एका गुन्ह्यात पोलिसांनी धारदार खंजरसह एका आरोपीस जेरबंद केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 एप्रिल रोजी सकाळी 8.45 वाजण्याच्या सुमारास जालना शहरातील राहुल नगर, राममंदिर व तुळजाभवानी परिसरात पायी जात असलेल्या सुभाष विठ्ठलराव खवणे (रा. पोलिस क्वॉर्टर कॉलनी, जालना) यांना तीन अज्ञात इसमांनी अडवून मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या खिशातील मोबाईल व रोकड जबरदस्तीने हिसकावून नेली.

robbery gang busted Jalna
Jalna Crime : जालना शहरात लूटमार करणारी टोळी जेरबंद

या प्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एका विधीसंघर्षित बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी चौकशीत त्याने साथीदारांसह लूटमारीची कबुली दिली. त्याच्याकडून 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

robbery gang busted Jalna
Jalna News : जबरी चोरीतील अट्टल आरोपी जेरबंद

14 एप्रिल रोजी रात्री काली मशिदीजवळ पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान सागर संतोष कोंडयाल (रा. लक्ष्मीनारायणपुरा, जुना जालना) याला संशयितरीत्या फिरताना पकडले. त्याच्याकडून एक धारदार खंजर जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कदीम जालना पोलिसांनी केली.

यांनी केली कारवाई

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल ,अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागिय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांचे नेतृत्वाखाली पोउपनि मच्छिंद्र वाघ, जमादार सदा राठोड, सचिन चौधरी, पोलिस कर्मचारी बाबा गायकवाड , खलील बेग, मतीन शेख, दिलीप गायकवाड, इम्रान खान, मुकेश झेंडे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news