

चपाती हा आपल्या रोजच्या आहाराचा अविभाज्य भाग आहे. डाळ असो किंवा भाजी, चपातीशिवाय जेवण अपूर्ण वाटते
योग्य प्रमाणात पोळीचे सेवन केल्यास वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. मात्र, अति सेवन केल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात
चपातीसोबत आहारात भाज्या, फळे किंवा पुरेसे पाणी घेत नसाल, तर शरीरात तंतुमय पदार्थांची कमतरता निर्माण होऊन बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू शकते
गव्हामधील ‘ग्लूटेन’मुळे गॅस, पोट फुगणे, जडपणा किंवा अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. विशेषतः रात्री जास्त पोळ्या खाल्ल्यास हा त्रास वाढू शकतो
चपातीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण अधिक असल्याने वजन वाढू शकते. वजन कमी करायचे असल्यास चपातीचे प्रमाण मर्यादित ठेवणे आवश्यक ठरते
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, सर्वसाधारणपणे दिवसातून दोन ते तीन चपाती खाणे योग्य मानले जाते
मात्र, हे प्रमाण व्यक्तीचे वय, वजन, शारीरिक हालचाल, आरोग्यस्थिती आणि आहाराच्या इतर घटकांवर अवलंबून बदलू शकते
एका गव्हाच्या चपातीत साधारण १७ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स आणि सुमारे ७० कॅलरी ऊर्जा मिळते
गव्हाच्या पोळ्यांचे जास्त सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांनी पोळ्या मर्यादित प्रमाणात खाव्यात