पुढारी वृत्तसेवा
पावसात पाय सतत ओले राहतात किंवा घाम साचतो. त्यामुळे ओलसर वातावरणात बुरशी वाढून पावसाळ्यात चिखल्या होतात
दिवसभर बंद शूज घातल्याने हवा खेळती राहत नाही. त्यामुळे पाय गरम व ओलसर राहून चिखल्या होतात
सार्वजनिक ठिकाणी सतत वावर, जिम, स्विमिंग पूल, सार्वजनिक बाथरूम येथे बुरशी सहज पसरून संसर्ग होऊन चिखल्या होतो
पाय नीट न धुणे किंवा कोरडे न करणे यामुळे संसर्ग वाढून पायाच्या बोटांच्या मध्ये चिखल्या होऊन जखम होते
मधुमेह, कमी इम्युनिटी असलेल्या लोकांना चिखल्या होण्याचा धोका सर्वाधिक असतो, त्यामुळे अशा लोकांनी पावसाळ्यात अधिक काळजी घेण्याची गरज असते
पायाच्या बोटांमध्ये खाज, त्वचा पांढरी, भुरभुरीत होणे, त्वचा सोलणे किंवा भेगा पडणे अशी चिखल्याची लक्षणे असतात, जखमेला दुर्गंधी येऊन जळजळ किंवा वेदना होतात
पावसातून आल्यानंतर पाय साबणाने धुवून पूर्ण कोरडे करा, विशेषतः बोटांच्या मध्ये थोडे नारळ तेल व हळद मिसळून लावल्यास आराम मिळतो
कोमट पाण्यात मीठ टाकून 10–15 मिनिटे पाय भिजवल्यास बुरशी कमी होण्यास मदत होते
रोज पाय धुऊन कोरडे करा, कॉटन सॉक्स वापरा आणि दररोज बदला, ओले बूट/चप्पल वापरू नका, सार्वजनिक ठिकाणी अनवाणी चालणे टाळा