सर्वसामान्यांना लखपती करणारी ‘ग्रामसुरक्षा योजना’ आहे तरी काय?

या योजनेत खूप गुंतवणूक करण्याची गरज नाही. टपाल खात्याची ही योजना सहजपणे लखपती करू शकते.

लोकांना दमदार परतावा देणारी टपाल खात्याची ही योजना आहे. या योजनेला भारत सरकारचे पाठबळ आहे. त्यामुळे या योजनांतील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते.

पोस्ट ऑफिसच्या ‘ग्रामसुरक्षा योजने’त कोणताही भारतीय नागरिक गुंतणूक करू शकतो. गुंतवणूक करणार्‍यांचे वय 19 ते 55 दरम्यान असणे गरजेचे आहे.

या योजनेत मॅच्युरिटीची रक्कम ही कमाल 80 वर्षांपर्यंत मिळू शकते. यात वार्षिक दहा हजारांपासून दहा लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता.

तिमाही, सहामाही, वार्षिक आधारावर पैसे जमा करू शकता. या पॉलिसीचे वैशिष्ट्य म्हणजे पाच वर्षांच्या कव्हरेजनंतर तिचे विमा पॉलिसीत रूपांतर होते.

‘ग्रामसुरक्षा योजने’वर गुंतवणूकदारांना कर्जाच्या सुविधेचा लाभ हा चार वर्षांनंतर मिळतो. पॉलिसी खरेदी केल्यानंतर तीन वर्षांनंतरही जमा करता येते. पॉलिसी पाच वर्षांच्या आत बंद केली तर बोनस मिळत नाही.