धोनीच्या नेतृत्वाखाली CSK ने IPL 2023 चे जेतेपद पटकावले. 

IPL च्या 16 व्या हंगामातील 74 सामन्यांमध्ये एकूण 2174 चौकार आणि 1124 षटकार मारले गेले. 

गिल, जैस्वाल, रिंकू सिंग, साई सुदर्शन या युवा खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.

गुजरात टायटन्सच्या शुभमन गिलने या हंगामात सर्वाधिक 85 चौकार मारले. 

गिलने तीन शतकांसह सर्वाधिक 890 धावा करून ऑरेंज कॅम्प जिंकली. 

राजस्थान रॉयल्सच्या यशस्वी जैस्वालने 14 डावांमध्ये 625 धावा केल्या.

जैस्वालने 26 षटकार आणि 82 चौकार फटकावले. 

IPL-2023 मध्ये त्याने चौकारांद्वारे 77.44 टक्के धावा वसूल केल्या. 

यशस्वीने मुंबई इंडियन्सविरुद्ध 124 धावांची (16 चौकार, 8 षटकार) खेळी खेळली.