दालचिनीची पेस्ट, त्यात थोडी साय, आणि गुलाबपाणी असा फेसपॅक लावल्यास मुरुम कमी होतात.

तोंडाला घाण वास येत असेल तर दालचिनी चघळावी, किंवा दालचिनी रात्रभर पाण्यात भिजवून त्या पाण्याने चूळ भरावी.

दालचिनीचा एक तुकडा आणि जेष्ठमधाची एक काडी चहात टाकून हा चहा घ्यावा. खोकल्यापासून आराम पडतो.

दालचिनीचा तुकडा, निलगिरी तेल यांची पेस्ट डोक्याला लावल्यास डोकेदुखीपासून आराम मिळतो.