चुकीची जीवनशैली, व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमची कमतरता, लठ्ठपणा, धूम्रपान, खाण्याच्या चुकीच्‍या सवयी या प्रमुख कारणांमुळे पाठदुखीचे रुग्ण वाढत आहेत.

पाठीदुखीवर उपचार करणारे तज्ज्ञ डॉक्‍टर सांगतात की, नियमित व्‍यायामाने रक्ताभिसरण सुधारेल. 

वेदना वाढल्या तरच फिजिओथेरपिस्टचा सल्ला घ्यावा. शरीरात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन-डीची कमतरता असल्यास हाडांमध्ये वेदना होतात.

शरीरात कॅल्शियमची कमतरता भासू नये म्हणून पौष्टिक अन्न खावे.

परंतु सकाळच्या उन्हात थोडा वेळ घालवला तर चांगले फायदे होतो. 

हाडे निरोगी ठेवण्यासाठी कॅल्शियम खूप महत्त्‍वाचे आहे. 

शरीराला पुरेसे कॅल्शियम मिळण्यासाठी चीज, दही, बदाम, तांदूळ, सोया, हिरव्या पालेभाज्या यांसारख्या दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करणे फायद्‍याचे ठरते, असे तज्ज्ञ सांगतात.