आलियाने नुकताच खरेदी केला आहे नवा आशियाना 🏡

आलियाच्या नव्या घराची किंमत जवळपास ३८ कोटी रुपये आहे.

वांद्रे पश्चिममध्ये आलियाने आणखी एक नवीन घर खरेदी केले असून हा फ्लॅट पाली हिल येथे आहे.

वांद्रे पश्चिम येथील हे नवीन घर 'इटर्नल सनशाईन प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड' या तिच्या प्रॉडक्शन हाऊसच्या नावाने खरेदी करण्यात आले आहे.

हा फ्लॅट १० एप्रिल २०२३ रोजी आलियाला हस्तांतरित करण्यात आला आहे.

मुंबईतील वांद्रे येथील पाली हिल येथील एरियल व्ह्यू को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड येथे हा फ्लॅट असून त्यासांठी तिने २ कोटी २६ लाख रुपयांचे मुद्रांक शुल्कही भरल्याचे समजते.

रिपोर्टनुसार, आलिया इंडस्ट्रीत सर्वाधिक कमाई करणारी बॉलिवूडची दुसरी अभिनेत्री आहे.