mental peace tips | मनशांती हवी आहे..? १० मिनिटांचे मौन तुमचे आयुष्य बदलू शकते!
कधीकधी आपण शब्दांतून स्वतःला जितके अचूक व्यक्त करू शकत नाही, त्यापेक्षा जास्त आपण शांत राहून व्यक्त करतो.
काही लोक केवळ 'न बोलणे' म्हणजे मौन मानतात, पण तसे अजिबात नाही. मौन म्हणजे केवळ शब्दांचा अभाव नव्हे, तर ती आंतरिक शांती आहे.
2013 मध्ये Brain Structure and Function जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, दोन तासांचे मौन मेंदूतील हिप्पोकॅम्पस (स्मरणशक्ती व भावनांशी संबंधित भाग) मध्ये नवीन पेशींची वाढ वाढवू शकते.
संशोधनानुसार काही वेळ मौन पाळल्याने मेंदू अधिक स्पष्टपणे विचार करतो. तणाव कमी होऊन निर्णयक्षमता सुधारते.
मौन पाळल्याने कॉर्टिसोल (तणाव हार्मोन) कमी होण्यास मदत होते. American Psychological Association च्या अहवालानुसार, नियमित ध्यान व शांत बसण्याची सवय तणाव नियंत्रणासाठी प्रभावी ठरते.
2006 मधील American Heart Association च्या संशोधनात आढळले की, दररोज काही मिनिटे शांत बसल्याने रक्तदाबात घट होते.
मौनामुळे मेंदूतील Amygdala (भीती आणि राग नियंत्रित करणारा भाग) कमी सक्रिय होतो, ज्यामुळे राग आणि चिंता कमी होतात.
गोंगाटापेक्षा शांततेत मेंदू अधिक स्पष्टपणे विचार करू शकतो. काही मिनिटे मौन राहण्याचा सराव केल्यास महत्त्वाचे निर्णय घेणे सोपे जाते.

