stress management tips |'स्ट्रेस हॉर्मोन'ला करा बाय-बाय! 'या' सोप्या टिप्स फॉलो करा

पुढारी वृत्तसेवा

शरीरात कॉर्टिसॉलची पातळी वाढल्याने उच्च रक्तदाब, मधुमेह आणि इतर जुनाट आजार होऊ शकतात.

जाणून घेऊया 'स्ट्रेस हॉर्मोन' म्हणून जाणाऱ्या कॉर्टिसॉलला कमी करण्याच्या सोप्या टिप्स

दीर्घ श्वास घेण्याच्या तंत्रांमुळे पॅरासिम्पेथेटिक मज्जासंस्था (शरीराला शांत करणे आणि ऊर्जा वाचवणे) सक्रिय होते, ज्यामुळे तणावाचे संकेत आणि कॉर्टिसॉलची वाढ लवकर कमी होते.

नियमित योगासने केल्‍याने मन-शरीर यांच्‍यातील संतुलन कायम राहण्‍यास मदत होते. सजगतेद्वारे कॉर्टिसॉल कमी होतो.

canva

दररोज ७-९ तासांची गाढ झोप कॉर्टिसॉलच्या वाढीस प्रतिबंध करते.

पोषक आहार रक्तातील साखर आणि पोटाचे आरोग्य स्थिर ठेवतो. त्‍यामुळे तणाव व्‍यवस्‍थापनास मदत होते.

हार्मोन्स संतुलित करण्यासाठी दिवसा लवकर चालणे, पोहणे किंवा हलके कार्डिओ यापैकी एक निवडा.

कॉर्टिसॉलची वाढ टाळण्यासाठी कॅफिन आणि अल्कोहोलचे सेवन कमी करा.

बागकाम करा. बागकाम केल्याने मनातील अस्‍वस्‍थता कमी होते, शांतता वाढते आणि मूड वाढवणारी रसायने तयार होतात.

येथे क्‍लिक करा.