

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाचे (Urvashi Rautela) नाव सध्या पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शाहसोबत जोडले जात आहे. उर्वशी नुकतीच आशिया चषकात भारतासोबत पाकिस्तान संघाची मॅच पाहताना स्टेडियममध्ये दिसली होती. तेव्हापासून नसीमचे नाव उर्वशीसोबत सोशल मीडियावर जोडले जात आहे.
पण या वृत्तांनंतर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह याने आता पुढे येत आपली बाजू मांडली आहे. नसीम शाहने उर्वशीला ओळखतही नसल्याचा खुलासा एका मुलाखतीत केला आहे. तो म्हणाला, उर्वशी रौतेला कोण आहे हेही त्याला माहीत नाही. तो म्हणाला की, जर कोणी मला पसंत करत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. पण आता क्रिकेट खेळण्याचा माझा प्लॅन आहे.
नसीम शाह म्हणाला, 'अशी कोणतीही योजना नाही. तुमच्या प्रश्नावर हसू येत आहे कारण उर्वशी कोण आहे हे मला माहीत नाही. ती कोणत्या प्रकारचे व्हिडिओ शेअर करते, मला माहीत नाही. माझी अशी कोणतीही योजना नाही. सध्या मी फक्त क्रिकेटवर लक्ष देत आहे.
आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये उर्वशीने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती दुबईच्या स्टेडियममध्ये स्टँड्समध्ये बसून सामना पाहाताना दिसतेय. उर्वशीला मोठ्या स्क्रिनवर पाहून पाकिस्तानचा गोलंदाज नसीम शाह लाजताना दिसत आहे. नसीमला लाजलेला पाहून उर्वशीही लाजून लालेलाल झालेली दिसते.
शाह म्हणाला, 'जर कोणी मला पसंत करत असेल तर ती चांगली गोष्ट आहे' (Urvashi Rautela)
नसीम शाह म्हणाला, 'खरं सांगायचं झालं तर मला याबाबत काहीच माहिती नाही. मी मैदानावर माझा खेळ खेळतो. मला काही कल्पना नाही. जे मैदानात येऊन सामना बघतात त्यातील कोणी मला पसंत करत असेल तर ही चांगली गोष्ट आहे. माझ्यासाठी येत असतील तर ही देखील चांगली गोष्ट आहे. मी कुठे अवकाशातून अवतारलो आहे. माझ्यात विशेष काही नाही. परंतु लोक माझ्यावर प्रेम करत असतील तर ती माझ्यासाठी चांगलीच गोष्ट आहे, असेही नसीम शाह म्हणाला.