Walt Disney : वॉल्ट डिस्ने करणार ७,००० कर्मचाऱ्यांची कपात

Walt Disney : वॉल्ट डिस्ने करणार ७,००० कर्मचाऱ्यांची कपात
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : टेक क्षेत्रातील मंदीमुळे गेल्या 3-4 महिन्यांत अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपातीचे धोरण स्वीकारले आहे. परिणामी गेल्या वर्षीच्या शेवटच्या तिमाहीत अनेकांनी आपल्या नोक-या गमावल्या. नवीन वर्षातही कंपन्यांमधून नोकर कपात सुरूच आहे. टेक क्षेत्रातील कंपन्यांनंतर मनोरंजन क्षेत्रातील मोठी कंपनी वॉल्ट डिस्नेने पुन्हा कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बॉब इगर यांनी बुधवारी (दि.८) झालेल्या कॉन्फरन्समध्ये कंपनीच्या अंतर्गत व्यापक पुनर्चना बाबतीत काही धोरणे स्पष्ट केली. यावेळी त्यांनी नोकरकापत करण्याचा निर्णय जाहीर केला. कंपनी तब्बल सात हजार कर्मचा-यांना कमी करणार आहे. वाचा सविस्तर बातमी. (Walt Disney)

म्हणून, ७००० कर्मचाऱ्यांची कपात 

वॉल्ट डिस्ने कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बॉब इगर यांनी कॉन्फरन्समध्ये आपण नोकरकपात करत असल्याचा निर्णय घेतला. ही नोकरकपात ७,००० कर्मचाऱ्यांची असणार आहे. ही नोकरकपात  "५.५ अब्ज डॉलर्सचा खर्च वाचवण्यासाठी आणि स्ट्रीमिंग व्यवसाय फायदेशीर बनवण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून  करणार असल्याचा निर्णय घेतला आहे.

Walt Disney : पाच वर्षात तिसरी पुनर्रचना

डिस्नेच्या पाच वर्षांचा विचार करता आपल्या धोरणांमध्ये तिसरी पुनर्रचना आहे. पहिली पुनर्रचना स्‍ट्रीमिंग व्‍यवसायाच्या वाढीला गती देण्‍यासाठी २०१८ मध्‍ये  केली गेली. २०२० मध्ये कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. यावेळी डिस्नेनेही स्‍ट्रीमिंगच्‍या वाढीला आणखी चालना देण्‍यासाठी  तब्बल ३२,००० कामगारांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली. आता तिसरी पुनर्रचना ही २०२३ मधील आहे. नवीन धोरणांनुसार ७००० हजार लोकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे.

Walt Disney : स्ट्रीमिंगला  प्राधान्य – इगर

डिस्नेने नोकर कपात करण्याच्या निर्णयानंतर सर्जनशील अधिकाऱ्यांच्या अंतर्गत, कंपनी तीन विभागांमध्ये पुनर्रचना करेल. एक मनोरंजन युनिट ज्यामध्ये चित्रपट, टेलिव्हिजन आणि स्ट्रीमिंग समाविष्ट आहे. या पुनर्रचनामुळे आमच्या ऑपरेशन्ससाठी अधिक किफायतशीर, समन्वित दृष्टीकोन मिळेल. इगर यांनी कॉन्फरन्स कॉलवर विश्लेषकांना सांगितले आहे की, "आम्ही कार्यक्षमतेने आव्हान घेऊन या निर्णयासाठी वचनबद्ध आहोत. त्याचबरोबर इगर असेही म्हणाले की, स्ट्रीमिंग हे डिस्नेचे सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे. डिस्ने आमच्या मूळ ब्रँड आणि फ्रेंचायझींवर अधिक लक्ष केंद्रित करेल.

डिस्नेची नोकर कपात जागतिक कर्मचार्‍यांपैकी अंदाजे ३.६%

वॉल्ट डिस्ने कंपनीने कंपनीचे एक धोरण म्हणून ७००० नोकऱ्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक स्तरावर डिस्नेमधील कर्मचाऱ्यांचा विचार करता जागतिक  कर्मचार्‍यांपैकी अंदाजे ३.६% नोकरकपात ही डिस्नेची आहे. डिस्नेमध्ये १ ऑक्टोबरपर्यंत सुमारे २ लाख २०,००० कामगार होते, त्यापैकी अंदाजे १ लाख ६६,००० यूएसमध्ये कार्यरत होते. तर डिस्नेचे शेअर्स काही तासानंतरच्या ट्रेडिंगमध्ये ४.७% वाढून $११७.२२ वर पोहोचले आहेत.

कोण आहेत बॉब इगर 

डिस्नेचे विद्यमान सीईओ बॉब इगर हे आहेत. त्यांनी २०२० मध्ये या पदावरुन पायउतार करावे लागले होते. त्यानंतर त्यांना नोव्हेंबर २०२२ मध्ये या पदावर आले. आता, इगर डिस्नेच्या स्ट्रीमिंग व्यवसायाला वाढ आणि नफा मिळवण्याचा प्रयत्न करेल. असं सांगण्यात आले आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news