

पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियाकडून युक्रेनवर हल्ले सुरूच आहे. रशियन फौजा आक्रमक झाल्या आहेत. परिणामी जगभरातून रशियावर अनेक निर्बंध लादले जात आहेत. मात्र याकडे पुतीन यांनी साफ दुर्लक्ष केले आहे. दरम्यान, रशियन-युक्रेन युद्धामुळे अवघे जग तिस-या महायुद्धाकडे वाटचाल करत असल्याची भीती लोकांना वाटत आहे. अनेक आंतरराष्ट्रीय अभ्यासक, तसेच पत्रकारांच्या मते रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा इगो युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी दुखावला. ते शांतीत क्रांती करणा-या पुतीन यांना सहन झाले नाही. अखेर त्यांनी युक्रेनवर हल्ला करण्याचे आदेश रशियन सैन्याला दिले. (Putin Walk Style)
पुतीन यांनी युक्रेनविरुद्धच्या युद्धाची संहिता काही महिन्यांपूर्वीच लिहिली होती. यादरम्यान रशियन फौजांना युक्रेनच्या सीमेवर तैनातीचे आदेश दिले. आंतरराष्ट्रीय स्तरावर परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली. अखेर फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या आदेशानंतर फौजांनी युक्रेनवर हल्ला चढवला आणि युद्ध छेडले. यानंतर सर्वच माध्यमे, सोशल मीडियावर पुतीन यांच्या व्यक्तीमत्वाची चर्चा सुरू झाली. व्लादिमीर व्लादिमीरोविच पुतिन हे रशियाचे सार्वभौम हुकूमशहा आणि सर्वशक्तिमान नेता कसे आहेत, याबाबतची विश्लेषणे सोशल मीडियावरून व्हायरल झाली. त्यापैकीच त्यांच्या 'चालण्याच्या स्टाईल'ची चर्चा आपण या वृत्तामध्ये करूया. त्यांच्या या स्टाईलला 'अल्फा मेल वॉक' असे नाव देण्यात आले आहे. (Putin Walk Style)
पुतिन चालताना त्यांचा उजवा हात न हलवता पावले टाकतात. पण यावेळी त्यांचा डावा हात पुढे मागे होत असतो. तज्ज्ञांच्या मतानुसार, पुतीन हे प्रत्येक क्षणाला अलर्ट मोडवर असतात. ते चालतानासुद्धा त्यांचा हा गुणधर्म जाणवतो. रशियाची गुप्तचर संस्था केजीबी (KGB)मधील शस्त्र प्रशिक्षणाचा त्यांच्यावर आयुष्यभर प्रभाव राहिला आहे. त्याचेच द्योतक म्हणून ते उजवा हात न हलवता चालतात. तथापि, काही तज्ज्ञांचा असा दावा आहे की, पुतिन यांना पार्किन्सन्सचा आजार आहे आणि त्यामुळे ते चालताना उजवा हात हलवू शकत नाहीत. (Putin Walk Style)
पण, जर आपण KGB च्या प्रशिक्षण नियमावलीवर विश्वास ठेवला तर गोष्टी थोड्या अधिक वैज्ञानिक आहेत. मॅन्युअलमध्ये म्हटल्याप्रमाणे, KGB मधून प्रशिक्षण घेतलेले सैनिक शस्त्रे हाताळताना उजव्या हातात वापर करतात. ते शस्त्रांना छातीजवळ धरून हात न हलवता चालतात. रशियन सैन्याचा असा विश्वास आहे की जर शत्रूने अचानक समोरून हल्ला केला तर ही पद्धत फायदेशीर ठरते.
गूढ केवळ पुतीन यांच्या चालण्यासंदर्भात नाही तर त्यांची जीवनशैली देखील आहे. व्लादिमीर लेनिन यांच्यानंतर ते रशियाचे सर्वात जास्त काळ राज्य करणारे शासक आहेत. राष्ट्राध्यक्ष होण्यापर्यंतचा पुतीन यांचा प्रवास हा काही साधा नाही. ते कधीही आपल्या सार्वभौमत्वाला धक्का पोहोचू देत नाहीत. म्हणूनच, पुतीन यांनी रशियन सैन्याच्या कमांडर्सना युक्रेनवर आक्रमण करण्यास परवानगी दिली.