होय! या झाडाला पैसे लागतात!

होय! या झाडाला पैसे लागतात!

सिडनी : रातोरात श्रीमंत व्हावे, हे अनेकांचे स्वप्न असते. पण ते प्रत्यक्षात प्रत्येकाला शक्य होतेच असे नाही. वारेमाप उधळपट्टीची खिल्ली उडवण्यासाठी, पैसे काय झाडाला लागतात का? असेही सहजपणे विचारले जाते. पण या वैविध्यपूर्ण जगात एक झाड असेही आहे, ज्याला चक्क पैसे लागतात, असे म्हटले तरी गैर ठरत नाही! हे झाड लावल्यानंतर काही कालावधीतच आपण अगदी लखपतीदेखील सहज होतो, असाच आजवरचा अनुभव आहे आणि म्हणूनच या झाडाविषयी जाणून घेणे विशेष रंजक ठरते.

तर हे झाड आहे युकलिप्टस! या झाडाचे मूळ ऑस्ट्रेलियात असल्याचे मानले जाते. अगदी कमी कालावधीत या झाडाची वाढ होते. काहीच वर्षांत पूर्ण वाढ झाल्यानंतर खर्‍या अर्थाने ते पैशाचे झाड होते. कारण या झाडाचे लाकूड अतिशय महागडे असते अन् या महागड्या लाकडामुळेच सदर झाडाला 'पैशाचे झाड' असे म्हटले जाते.

युकलिप्टसचे झाड सरळ वाढते. याची 3 हजार रोपे लावण्यासाठी केवळ 25 हजारांच्या आसपास खर्च येतो. 4 ते 5 वर्षांत झाडे इतकी मोठी होतात की, एका झाडातून 400 ते 500 किलो लाकूड मिळू शकते. या हिशेबाने 4 ते 5 वर्षांत 3 हजार झाडांचे 12 लाख किलो लाकडाचे उत्पादन होऊ शकते. काही रिपोर्टस्मध्ये असा दावा करण्यात आला आहे की, या लाकडाचा भाव प्रती किलो 6 रुपये असतो. पण तरीही यानंतरही आपण त्यापासून 72 लाख रुपयांची कमाई करू शकतो. लागवड वाढवली तर उत्पन्नही वाढते.

युकलिप्टसचे याशिवायही अनेक फायदे आहेत. हे झाड मलेरिया होण्यापासून रोखते, असे मानले जाते. युकलिप्टसच्या झाडांना अधिक पाणी लागते आणि ते गढूळ पाणी लवकर शोषून घेते. जेथे गढूळ पाणी अधिक तेथे ही झाडे अधिक जोमाने वाढतात. युकलिप्टसचे तेलदेखील गुणकारी असते. श्वासाशी संबंधित आजार दूर करण्यासाठी याचा वापर केला जातो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news