हिरव्या सफरचंदामुळे मिळतात अनेक लाभ

हिरव्या सफरचंदामुळे मिळतात अनेक लाभ
Published on
Updated on

नवी दिल्ली :  'रोज एक सफरचंद खा आणि अनेक आजारांना दूर ठेवा', असे सांगितले जाते. याचे कारणही तसेच खास आहे. या फळात आरोग्याचा खजिनाच लपला आहे. हे फळ खाल्याने आरोग्याला अनेक लाभ मिळतात. तसे पाहिल्यास जगभरात लाल सफरचंद मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते; मात्र हिरवे सफरचंदही आरोग्यासाठी भरपूर लाभदायी असते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

ग्रीन अ‍ॅप्पलमध्ये कॅल्शियम, आयर्न, विटॅमिन आणि अँटिऑक्सिडंट यासारखे अनेक घटक असतात. जे शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतात. हिरव्या रंगाच्या सफरचंदामध्ये क्यूर्सेटिन नामक घटक आढळतो. यामुळेच मानसिक स्थिती बळकट करण्यासाठी हिरव्या रंगाचे सफरचंद फारच उपयोगी ठरते. तज्ज्ञांच्या मते, ज्या लोकांना अल्झाईमरचा आजार आहे, त्यांनी नियमितपणे या फळाचे सेवन केले, तर या आजाराची तीव्रता कमी करण्यास मदत मिळते.

हिरव्या सफरचंदामध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते. हे कल्शियम हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असते. खासकरून ठरावीक वयानंतर महिलांची हाडे ठिसूळ होऊ लागतात. अशावेळी नियमितपणे हिरव्या सफरचंदाचे सेवन केले, तर ही हाडांची समस्या काही प्रमाणात निकाली लागू शकते. याशिवाय या फळामध्ये असलेले पोषक घटक लिव्हर बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यातील अँटिऑक्सिडंट व फायबरमुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत मिळते. याशिवाय वाढलेले वजन कमी अथवा नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news