हवाई बेटाच्या आसमंतात ‘गूढ’ निळी आकृती

हवाई बेटाच्या आसमंतात ‘गूढ’ निळी आकृती
Published on
Updated on

वॉशिंग्टन ः अमेरिकेतील हवाई बेटांजवळ निळ्या रंगाची रहस्यमय आकृती दिसली आहे. ही आकृती पाहून अनेक लोक चकीत झाले. हे एलियन्सचे 'यूफोे' तर नाही ना? अशी चर्चा या निमित्ताने रंगली. या आकृतीचे छायाचित्र सॅटेलाईट कॅमेर्‍यात कैद झाले आहे. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर या रहस्यमयी आकृतीचे गूढ आणखी वाढले, मात्र नंतर त्याचा खुलासाही झाला.

18 जानेवारी रोजी ही आकृती दिसली. ही भोवर्‍यासारखी फिरणारी गोलाकार आकृती अवकाशातील एखाद्या आकाशगंगेप्रमाणे दिसत होती. ही निळी आकृती अत्यंत वेगाने फिरत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. ही आकृती वेगाने फिरत असताना अचानक पुन्हा गायब झाली. त्यामुळे ही आकृती म्हणजे एलियन्सचे 'यूफो' तर नाही ना, असा प्रश्न अनेकांना पडला.

ही रहस्यमयी आकृती जपानच्या सुबारू टेलिस्कोपने सर्वप्रथम आपल्या कॅमेर्‍यात कैद केल्याचे समजते. टेलिस्कोप सेंटरच्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 'स्पेस एक्स'च्या 'फाल्कन-9' रॉकेटच्या प्रक्षेपणानंतर काही वेळातच सुबारू दुर्बिणीने ढगांचा हा रहस्यमयी भोवरा फिरताना पाहिला. या रॉकेटमध्ये अमेरिकन सैन्याचा एक मोठा उपग्रह होता.

व्हिडीओचा सखोल अभ्यास केल्यानंतर या रहस्यमय आकृतीबाबत मोठा खुलासा झाला. 'स्पेसएक्स'च्या रॉकेटच्या प्रक्षेपणानंतर रॉकेटचा दुसरा भाग वेगळा झाल्यावर तेथे तयार झालेल्या इंधनाच्या ढगांपासून तयार झालेला भोवरा म्हणजे ही आकृती आहे. जेव्हा पहिल्या टप्प्याचे रॉकेट दुसर्‍या टप्प्यापासून वेगळे होते तेव्हा अशा प्रकारच्या आकृत्या तयार होतात. हे रॉकेट पृथ्वीवर परत येताना दुसरा टप्पा उपग्रहाला अवकाशाच्या दिशेने ढकलतो. असा स्थितीत ही आकृती तयार झाल्याचा दावा करण्यात येत आहे. याला 'स्मोक रिंग' असेही म्हणतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news