हत्ती एकमेकांना असे करतात ‘हॅलो’!

हत्ती एकमेकांना असे करतात ‘हॅलो’!

वॉशिंग्टन : दोन हत्ती एकमेकांना भेटले की तेही माणसाप्रमाणेच एकमेकांना 'रामराम' किंवा 'हॅलो' करीत असतात. त्यांची एकमेकांना अभिवादन करण्याची पद्धत कशी असते याबाबतही आता संशोधन झाले आहे. त्यानुसार हत्ती कान हलवून आणि कुजबुज केल्यासारखा हळू आवाज काढून एकमेकांना अभिवादन करतात!

याबाबतच्या संशोधनाची माहिती 'कम्युनिकेशन्स बायोलॉजी' या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. हत्ती सहेतुक संवाद साधत असतात आणि समोरचे हत्ती काय करीत आहेत यावर ते अवलंबून असते. उदाहरणार्थ, ज्यावेळी समोरच्या हत्तींचे आधीच तुमच्याकडे लक्ष असेल तर ते केवळ हावभावातून अभिवादन करतात. तसे नसेल तर ते एकमेकांना सोंडेने स्पर्शही करतात. व्हिएन्ना युनिव्हर्सिटीतील वेस्टा एल्युटरी यांनी याबाबतचे संशोधन केले.

त्यांनी सांगितले की, हत्ती आपल्या शरीराचा संवादासाठी कसा वापर करतात हे जाणून घेणे रंजक होते. ते आपल्या शरीराचाही यासाठी वापर करतात हे खरे तर अनोखेच होते. यापूर्वीच्या संशोधनातून हे आधीच स्पष्ट झाले आहे की, हत्ती माणसाला ऐकू न येणार्‍या वारंवारतेचे सूक्ष्म ध्वनी निर्माण करून अनेक मैल दूर असलेल्या आपल्या साथीदारांशी संवाद साधत असतात. हत्ती आणि माणूस दोघेही संवाद साधत असले तरी हत्तींची दृष्टी माणसाच्या तुलनेत मंद असते. ते संवादासाठी आवाज आणि गंधावर भर देतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news