स्पॅम ई-मेलवर समजले कोट्यवधींची लागलीय लॉटरी!

स्पॅम ई-मेलवर समजले कोट्यवधींची लागलीय लॉटरी!
Published on
Updated on

ऑकलंड : कुणाचे नशीब कसे आणि कधी उघडेल हे काही सांगता येत नाही. अनेकांना आपल्याला लॉटरी लागलेली आहे हेही उशिरा समजते. न्यूझीलंडमधील ऑकलंड शहरात राहणार्‍या एका महिलेबाबतही असेच घडले. लॉरा स्पियर या महिलेस आपल्याला तब्बल 22 कोटी रुपयांची लॉटरी लागली असल्याचे ठाऊकच नव्हते. तिने मेलबॉक्समध्ये आलेला एक स्पॅम मेल तपासला त्यावेळी तिला याबाबतची माहिती समजली!

लॉरा तिचे जुने मेल पाहण्यासाठी मेलबॉक्समधील स्पॅम फोल्डर पाहत होती. त्यावेळी तिचे लक्ष एका ई-मेलकडे गेले. त्या ई-मेलमध्ये तिने लॉटरी जिंकल्याचे म्हटले होते. तिने तब्बल 22 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली होती. आधी तिला हा फेक ई-मेल असावा असे वाटले. स्पॅममध्ये आलेले ई-मेल सहसा उघडले जात नाहीत. एक तर त्यामध्ये व्हायरस असतात किंवा फसवणुकीसाठी एखादे आमिष दाखवून जाळ्यात ओढले जात असते. त्यामुळे लॉराने त्याकडे दुर्लक्ष करण्याचा सूज्ञ निर्णय घेतला.

मात्र, नंतर तिला आठवले की तिने 31 डिसेंबरच्या मेगा मिलियनमध्ये भाग घेतला होता. त्यावेळी मिशिगन लॉटरीच्या वेबसाईटवरून तिने एक तिकीट खरेदी केले होते. मग तिने तो मेल नीट वाचला आणि तिच्या लक्षात आले की तिला खरेच 3 दशलक्ष डॉलर्सची म्हणजेच 22 कोटी रुपयांची लॉटरी लागलेली आहे! नुसत्या मेलवर विश्वास ठेवायला नको म्हणून तिने कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन याबाबतची अधिक माहिती वाचली. त्यामध्येही तिला तिचे नाव दिसल्यावर तिची खात्री पटली आणि तिच्या आनंदाला आकाश ठेंगणे झाले!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news