स्कॉटलंडमध्ये सापडली चांदीची मोठी नाणी

स्कॉटलंडमध्ये सापडली चांदीची मोठी नाणी

लंडन : स्कॉटलंडमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठ्या आकाराची ठरतील अशी चांदीची प्राचीन नाणी सापडली आहेत. या खजिन्यात 8400 पेक्षाही अधिक नाण्यांचा समावेश असून त्यापैकी बहुतेक नाणी ही 13 व्या आणि 14 व्या शतकातील आहेत.

स्कॉटिश सरकारचे प्रवक्ते केन मॅकनॅब यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की यापैकी बहुतांश नाणी ही एडवर्डीयन काळातील पेनी आहेत. इंग्लंडमध्ये सन 1272 ते 1307 या काळात राज्य करणार्‍या किंग एडवर्ड पहिला याच्या काळातील ही चांदीची नाणी आहेत. त्या काळात इंग्लंड आणि स्कॉटलंडमध्ये दोन वेगवेगळी राज्ये होती. या दोन्ही राज्यांमध्ये लढायाही होत असत.

स्कॉटलंडमध्ये जुन्या काळातील नाणी सापडणे ही एक दुर्मीळ घटनाच असते. अशा स्थितीत हा मोठाच खजिना सापडल्याने ही एक विशेष घटना ठरली आहे. 19 व्या शतकापासून आतापर्यंत सापडलेला हा मध्य युगातील नाण्यांचा सर्वात मोठा खजिना असल्याचे मॅकनॅब यांनी सांगितले. डुनस्कोर या गावात काही मेटल डिटेक्टरीस्टनी या खजिन्याचा छडा लावला होता. यामधील नाणी अतिशय मोठ्या आकाराची असून ती स्कॉटलंडमधील सर्वात मोठी नाणी ठरू शकतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news