सोलार ऑर्बिटरने शुक्रावर पाहिला कार्बनडायऑक्साईड

सोलार ऑर्बिटरने शुक्रावर पाहिला कार्बनडायऑक्साईड
Published on
Updated on

पॅरिस : अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था 'नासा' व युरोपियन स्पेस एजन्सी 'ईसा' सध्या शुक्रावर वेगवेगळ्या मोहिमा पाठवण्याची तयारी करत आहे. मात्र, ईसाने यापूर्वीच सूर्याच्या अवलोकनासाठी पाठविलेला 'सोलार ऑर्बिटर' सध्या शुक्राजवळून जात आहे. यादरम्यान, हा ऑर्बिटर शुक्राबाबत महत्त्वपर्ण माहिती देऊ लागला आहे.

सोलार ऑर्बिटरच्या माध्यमातून शुक्राबाबत भरपूर आकडेवारी मिळेल, असा विश्वास शास्त्रज्ञांना वाटतोय. तसेच ताज्या माहितीनुसार शुक्राच्या वातावरणामधून कार्बनडायऑक्साईड बाहेर पडत आहे. यामुळे आर्बिटरकडून मिळणार्‍या संभाव्य आकडेवारीच्या मदतीने सौरवार्‍याचा शुक्रावरील परिणामांचा अभ्यास करण्याचा शास्त्रज्ञांचा प्रयत्न असेल.

शास्त्रज्ञांच्या मते, सोलार ऑर्बिटरकडून उपलब्ध होत असलेल्या आकडेवारीमुळे सौरवार्‍याचा गेल्या लाखो वर्षांत शुक्रावर झालेल्या परिणामांचीही माहिती समजेल. तसे पाहिल्यास शुक्र हा सूर्याचा अगदी जवळचा ग्रह असल्याने सौरवार्‍याचा त्याच्यावर जास्त प्रभाव पडत असतो. पॅरिसमधील 'इको पॉलिटेक्निक'च्या संशोधिका लिना हॅदिद यांनी सांगितले की, शुक्र आणि सूर्याच्या आंतरप्रक्रियांची सध्या फारच कमी माहिती उपलब्ध आहे. मात्र, शुक्राच्या अनोख्या वातावरणाला समजून घेण्यासाठी या आंतरप्रक्रिया समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या तरी शुक्राच्या वातावरणावर मोठ्या प्रमाणात ग्रीनहाऊसचा प्रभाव पहावयास मिळतो.

हॅदिद यांच्या मते, आकडेवारीने शुक्राच्या वातावरणात कार्बनडायऑक्साईड हा वायू असल्याचे सिद्ध होते. सौरवार्‍यामुळे शुक्राच्या वातावरणातून कार्बनडायऑक्साईड व ऑक्सिजनही बाहेर पडू शकतो. अगदी हीच प्रक्रिया मंगळाबाबतही घडली असणार.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news