सिलिकोसिस पासून बचाव करणारे उपकरण

सिलिकोसिस पासून बचाव करणारे उपकरण
Published on
Updated on

नवी दिल्ली : काच उद्योग, वाळू खनन, खडी बनवणारे क्रशर किंवा दगडांच्या खाणीत काम करणार्‍या मजुरांपासून ते दगड कोरणारे कारागीर, शिल्पकार तसेच बांधकाम व्यवसायातील कामगारांपर्यंत अनेकांना 'सिलिकोसिस' या फुफ्फुसांच्या असाध्य आजाराने ग्रस्त होण्याचा धोका असतो.

आता भारतीय संशोधकांनी त्यापासून बचाव करण्यासाठी दोन नवे फिल्टरेशन उपकरणे बनवली आहेत. ही उपकरणे अशा कामगार व मूर्तिकारांना लाभदायक ठरू शकतात. या उपकरणांमुळे सिलिका कणांच्या धुळीत राहूनही हे कामगार सहजपणे श्वास घेऊ शकतील आणि सिलिकोसिस आजाराच्या विळख्यापासून दूर राहतील.

केंद्रीय इलेक्ट्रॉनिकी अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान (सीरी), पिलानीच्या वैज्ञानिकांनी ही दोन्ही फिल्टरेशन उपकरणे बनवली आहेत. ते सिलिकाचे अतिशय सूक्ष्म कणही वेगाने शोषून घेऊ शकतात. त्यामुळे असे हानिकारक कण श्वासाच्या मार्गातून फुफ्फुसापर्यंत जाण्यापासून रोखले जाऊ शकतात.

यापैकी एका उपकरणाचा वापर केवळ एक कामगार करू शकतो, तर दुसरे उपकरण चार कामगार एकत्रितपणे करू शकतात. ही उपकरणे माणसाच्या श्वास घेण्याच्या वेगापेक्षा दहा पटीने अधिक वेगाने धुळीचे कण शोषून घेऊ शकतात.

हवेतील धूलिकणांना शोषून घेऊन त्यांना हे उपकरण पाण्यात मिसळून टाकते. त्यामुळे ते पुन्हा हवेत मिसळत नाहीत व पाण्यात तळाशी ते साचले जातात व त्यांचा अन्य कामासाठी वापर करता येतो. चार कामगारांसाठीच्या उपकरणात काही बदलांसह चार अवशोषक शाखा आहेत. त्यांची आपली वेगळी नियंत्रण यंत्रणा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news