सायकलीवरून जाणारे पंतप्रधान!

सायकलीवरून जाणारे पंतप्रधान!

Published on

अ‍ॅम्स्टरडॅम : सायकल चालवण्याचे दोन उपयोग आहेत. एक म्हणजे त्यामुळे हवेचे प्रदूषण टाळले जाते आणि दुसरे म्हणजे शारीरिक व्यायामही होतो. 3 जूनला संपूर्ण जगभर 'जागतिक सायकल दिवस' साजरा करण्यात आला. अनेक देशांमध्ये लोक दुचाकी, चार चाकी वाहनांऐवजी सायकलीवरून फिरण्याला प्राधान्य देतात. नेदरलँड हा याबाबतीत अग्रेसर देश आहे. विशेष म्हणजे या देशाचे पंतप्रधानही रोज सायकलीवरूनच आपल्या कार्यालयात येतात!

नेदरलँड हा असा देश आहे जिथे रस्त्यांवर सायकलींचेच साम—ाज्य आहे. तेथील रस्त्यावर पहिला अधिकार सायकलस्वारांचा असतो. याठिकाणी सायकल चालवणे इतके लोकप्रिय आहे की स्वतः पंतप्रधान मार्क रूटही सायकलवरूनच आपल्या कार्यालयात जातात. नेदरलँडची राजधानी अ‍ॅम्स्टरडॅममधील रिंग रोड आणि लेन या सायकलस्वारांसाठी असलेल्या जबरदस्त नेटवर्कने संपन्न आहेत.

याठिकाणी सायकल चालवणे इतके सुरक्षित आहे की वृद्ध लोकांपासून लहान मुलांपर्यंत अनेकजण सायकलीचा वापर करतात. केवळ राजधानीतच नव्हे तर देशाच्या अनेक शहरांमध्ये सायकल लोकप्रिय आहे. यासाठी 70 च्या दशकात विशेष प्रयत्न करण्यात आले होते. बाईक आणि मोटारींच्या जमान्यातही सायकलीला स्वतःचे स्थान टिकवून ठेवणे व हे वाहन लोकप्रिय बनवणे यासाठी जाणीवपूर्वक झालेल्या प्रयत्नांचे हे फळ आहे! आता अ‍ॅम्स्टरडॅम ही जगाची 'सायकल राजधानी'ही बनली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news