सरड्यासारखा मासाही बदलतो शरीराचा रंग

सरड्यासारखा मासाही बदलतो शरीराचा रंग

Published on

कॅलिफोर्निया : सरड्याला रंग बदलणारा जीव म्हणून ओळखले जाते. यासंबंधीची एक म्हणही चांगलीच प्रचलित आहे. पृथ्वीतलावर असा आणखी एक जीव असून तो चक्‍क सरड्याप्रमाणेच आपला रंग बदलतो आणि तो म्हणजे मासा. 'लंपफिश' असे त्याचे नाव.

उत्तर अटलांटिक व आर्क्टिक महासागरातील ठिकाणच्या काही खोल भागांत लंपफिश आढळतो. अनेक रंगांत आढळणारा हा जीव वयोमानाप्रमाणे रंग बदलत असतो. रंगाबरोबरच चमकदार असणार्‍या या माशासंबंधीचे एक नवे संशोधन 'जर्नल ऑफ फिश बायोलॉजी'मध्ये नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.

शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार लंपफिशचा मूळ रंग हा 'फ्लोरोसेंट ग्रीन' असतो. शरीर चमकविण्यासाठी हा मासा आपल्या 'बायोफ्लोरेसेंट' चमकेचा वापर करत असतो. याशिवाय हे मासे या चमकेचा वापर एकमेकांना ओळखण्यासाठी, चर्चा करण्यासाठी तसेच भक्ष्याला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी करतात.

संशोधनातील माहितीनुसार साध्या प्रकाशात लंपफिश मासे हिरव्या रंगात दिसतात. मात्र, युवी लाईटमध्ये पाहिल्यास त्यांच्या शरीरावर नियॉन-हिरव्या रंगाची चमक दिसून येते. ज्यावेळी हे मासे लहान असतात, त्यावेळी ते इंद्रधनुष्यातील कोणत्याही रंगाचे असू शकतात. किशोरावस्थेत त्यांचा रंग आसपासच्या परिस्थितीनुसार बदलत असतो. असे करून ते शिकार्‍यापासून आपले संरक्षण करून घेत असतात. प्रजननावेळी मादी निळ्या-हिरव्या रंगात असते आणि नर लाल-नारंगी रंगात असतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news