शाहरूखबरोबर काम ही सुवर्णसंधी!

शाहरूखबरोबर काम ही सुवर्णसंधी!

राजकुमार हिराणीच्या आगामी 'डंकी'मध्ये तापसी पन्‍नू ही शाहरूख खानसमवेत झळकणार आहे. तापसी स्वतः शाहरूखची मोठीच चाहती आहे आणि या सुपरस्टारबरोबर काम करण्याची संधी ही आपल्यासाठी सुवर्णसंधीच असल्याचे तिने म्हटले आहे. तिने एका मुलाखतीत सांगितले, 'राजकुमार हिराणी यांचे सर्व चित्रपट क्लासिक आहेत. त्यांच्या चित्रपटात शाहरूखसमवेत काम करणे ही सुवर्णसंधीच आहे. माझ्याप्रमाणेच शाहरूख खानही दिल्‍लीचे आहेत आणि त्यांची सुरुवात माझ्यासारखीच झाली होती. त्यांचा इंडस्ट्रीतील प्रवास माझ्यासारखाच आहे असे मला वाटते.

 'डंकी' हा चित्रपट 22 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सध्या तापसीचा 'शाबाश मिठू' हा चित्रपट चर्चेत असून तो 15 जुलैला प्रदर्शित होणार आहे. त्यामध्ये तिने भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज हिची भूमिका साकारली
आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news