व्लादिमिर पुतीन वापरतात दहा लाखांचे जॅकेट

व्लादिमिर पुतीन
व्लादिमिर पुतीन
Published on
Updated on

मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन हे भलेही 69 वर्षांचे असले तरी त्यांची वयस्क नेता अशी छबी बिल्कुल नाही. ते अजूनही शर्टलेस होऊन शिकार करतात. घोडेस्वारी करतात. पुतीन यांची मैत्रीण आणि त्यांच्या आलिशान लाईफस्टाईलबद्दल नेहमीच चर्चा होत असते. पुतीन यांचे शौक अत्यंत महागडे आहेत. यापैकी एक म्हणजे कोट. पुतीन तब्बल 10 लाखांहून अधिक किमतीचे जॅकेट वापरतात.
पुतीन यांच्याजवळ लक्झरी घडाळ्यांचे कलेक्शन आहे. यामध्ये अत्यंत महागड्या घडाळ्यांचा समावेश आहे. युक्रेनवर हल्ला केल्यानंतर पुतीन सातत्याने संकटाच्या विळख्यात सापडत आहेत, असेच वाटते. कारण रशियावर अनेक देशांनी निर्बंध लादले आहेत. यामुळे या देशाच्या अर्थव्यवस्थेची सध्या ओढाताण सुरू आहे. असे असले तरी पुतीन हे आपली फॅशन, कपड्याच्या बाबतीत कसलाच समझोता करत नाहीत. गेल्या आठवड्यातच युद्ध समर्थक रॅलीला मार्गदर्शन करताना पुतीन यांनी 10 लाखांहून अधिक किमतीचा पियाना जॅकेट घातले होते.

दरम्यान, पुतीन यांच्या सूटची किंमत चार लाख रुपयांपासून सुरू होते. हे सूट एक कुशल टेलरच शिवत असतो. पुतीन हे बहुतेकवेळा ब्लॅक सूट आणि रेड टायमध्ये नजरेस पडत असतात.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कपड्यांमध्ये पुतीन यांचे आवडते ब्रँड म्हणजे ब्रियोनी. ते सल्वाटोर फेरागामो या जॉन लॉबचे बूट वापरतात. त्यांच्याकडे कपड्यांपेक्षा महागडी घड्याळे आहेत. यामधील एका घडाळ्याची किंमत तीन कोटींपेक्षा जास्त आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news