लिंकन आणि केनेडी यांच्या जीवनातील अद्भुत साम्य

लिंकन आणि केनेडी यांच्या जीवनातील अद्भुत साम्य

अमेरिकेचे दिवंगत राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन आणि जॉन एफ. केनेडी हे दोघेही अत्यंत लोकप्रिय होते. दोघांच्या काळात शंभर वर्षांचे अंतर होते; मात्र तरीही दोघांच्या जीवनातील अनेक घटनांमध्ये विलक्षण साम्य आढळते. दोघांचीही माथेफिरूंकडून हत्या झाली इतकेच हे साम्य नाही, तर दोघांच्या जीवनातील अनेक घटनांच्या तारखा, व्यक्तींची नावे व अन्यही अनेक बाबतीत आश्चर्यकारक असे साम्य पाहायला मिळते. त्याची ही माहिती…
  • अब्राहम लिंकन यांची सन 1846 मध्ये अमेरिकन काँग्रेसमध्ये निवड झाली. जॉन एफ. केनेडी यांची सन 1946 मध्ये काँग्रेसमध्ये निवड झाली.
  • लिंकन हे सन 1860 मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले. जॉन एफ. केनेडी हे 1960 मध्ये राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले.
  • लिंकन आणि केनेडी हे दोघेही विशेषतः नागरी हक्कांबाबत जागरुक होते.
  • व्हाईट हाऊसमध्ये असताना दोघांच्याही पत्नींनी आपले एक बाळ गमावले.
  • दोन्ही राष्ट्राध्यक्षांची शुक्रवारीच गोळी झाडून हत्या करण्यात आली.
  • दोघांच्याही डोक्यातच गोळी झाडण्यात आली.
  • लिंकन यांच्या सेक्रेटरीचे नाव केनेडी होते तर केनेडी यांच्या सेक्रेटरीचे नाव लिंकन होते!
  • दोन्ही राष्ट्राध्यक्षांची हत्या दक्षिणेकडील मारेकर्‍यांकडून झाली.
  • दोन्ही राष्ट्राध्यक्षांच्या मृत्यूनंतर राष्ट्राध्यक्ष बनलेल्या व्यक्तींचे नाव जॉन्सन होते.
  • लिंकन यांच्यानंतर राष्ट्राध्यक्ष बनलेल्या अँड्र्यू जॉन्सन यांचा जन्म सन 1808 मध्ये झाला; तर केनेडी यांच्यानंतर राष्ट्राध्यक्ष बनलेल्या लिंडन जॉन्सन यांचा जन्म सन 1908 मध्ये झाला.
  • लिंकन यांचा मारेकरी जॉन विल्कीस बूथ याचा जन्म सन 1839 मध्ये झाला तर केनेडी यांचा मारेकरी ली हार्वे ओसवाल्ड याचा जन्म सन 1939 मध्ये झाला.
  • दोघाही मारेकर्‍यांची ओळख त्यांच्या अशा तीन नावांनी होती.
  • दोघांच्या नावांमधील इंग्रजी अक्षरे पंधरा आहेत.
  • लिंकन यांची हत्या 'फोर्ड' नावाच्या थिएटरमध्ये झाली तर केनेडी यांची हत्या 'फोर्ड' कंपनीने बनवलेल्या 'लिंकन' नावाच्या गाडीत झाली!
  • बूथ आणि ओसवाल्ड यांना त्यांच्यावर खटला सुरू होण्यापूर्वीच मारण्यात आले.
  • लिंकन यांची हत्या होण्यापूर्वी एक आठवडा आधी ते मेरीलँडच्या मन्रो येथे होते तर केनेडी यांची हत्या होण्यापूर्वी एक आठवडा आधी ते हॉलीवूडची सौंदर्यवती मर्लिन मन्रो हिच्यासमवेत होते!
  • लिंकन यांच्यावर थिएटरमध्ये गोळी झाडल्यावर मारेकरी वेअरहाऊसकडे पळाला तर केनेडी यांच्यावर वेअरहाऊसमधून गोळी झाडल्यानंतर मारेकरी थिएटरकडे पळाला!
logo
Pudhari News
pudhari.news