

लंडन : युक्रेन आणि रशिया यांच्यातील भीषण युद्धामुळे युरोप खंडात असलेल्या काळ्या समुद्रातील (ब्लॅक-सी) सागरी जीवन प्रभावित होत आहे. युद्धामुळे या समुद्रात राहणार्या जीवांची संरक्षण प्रक्रिया बाधित होत आहे. यासंदर्भात करण्यात आलेल्या संशोधनातील दाव्यानुसार काळ्या समुद्रातील डॉल्फिन व अन्य अशा हजारो जीवांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय असामान्यपणे जाळ्यात अडकणे व मच्छीमारांकडून चुकीच्या पद्धतीने पकडणे यामध्येही वाढ झाली आहे.
अॅग्रीमेंट ऑन द कन्झर्व्हेशन ऑफ सॅटेशन्स ऑफ द ब्लॅक सी, मेडिटेरेनियन सी अँड काँटेजियस अटलांटिक एरियाने हे महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. यासंबंधीच्या अहवालातील माहितीनुसार 2022 चा उन्हाळा व वसंत ऋतूमध्ये स्टँ्रडिंग आणि बायकॅचसंबंधी घटनांत असामान्यपणे मोठी वाढ झाली आहे.
युक्रेन आणि रशिया यांच्यात फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या युद्धामुळे काळा समुद्र प्रभावित झाला आहे. किनारी व समुद्रातील वाढलेल्या हालचालींमुळे सागरी जीवन संकटात सापडले आहे. यात व्हेल, डॉल्फिन, पर्पेस यासारख्या सेटेशियन जीवांचा समावेश आहे. अउउजइअचड समवेत काम करणार्या युकेतील व्हेल अँड डॉल्फिन कंझर्व्हेशनचे संशोधक एरिच हॉयट यांनी सांगितले की, समुद्रातील वाढलेल्या हालचालींमुळे सुमारे 700 हून अधिक मोठ्या जीवांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने डॉल्फिन आणि पर्पेज यांचा समावेश आहे. हे मृत्यू बल्गेरिया, रोमानिया, तुर्की आणि युक्रेनच्या किनारपट्टी भागांत झाले आहेत.